Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा (allu arjun) ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The rise) हा 2021 चा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा होता. त्याने संपूर्ण बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. वेळोवेळी शूटिंग सुरू झाल्याच्या बातम्या येत होत्या. कथा अशी असेल. या दिवशी पडद्यावर येईल. एकूणच लोक अंदाज बांधत होते. यानंतर निर्मात्यांनी फहद फासिल आणि अल्लू अर्जुनचा लूकही उघड केला होता. आता त्याची खरी रिलीज डेट समोर आली आहे. तेलगू चित्रपट उद्योगातील पॅन इंडिया चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ पुढील वर्षी 2024 मध्ये रिलीज होणार आहे.
How is #AlluArjun look from #Pushpa2?
||#Pushpa2TheRule | #Pushpa|| pic.twitter.com/2s9TPuZMas
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) August 30, 2023
पुष्पा 2 च्या सेटवरून अल्लू अर्जुनची झलक
इंस्टाग्रामने आपल्या अधिकृत हँडलवर अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २’ चा सेट दाखवला. त्याचे घरही दाखवले आहे. एवढंच नाही तर अल्लू अर्जुनने त्याचं दिवसभराचं रुटीनही शेअर केलं आहे. सकाळी उठल्यानंतर तो काय करतो? रामोजी फिल्मसिटीमध्ये बांधलेल्या सेटवर पोहोचताचक्षणी तो चाहत्यांशी संवादही साधतो. मग सेटवर पोहोचल्यावर तो तयार होतो. कॉश्च्युम, मेकअप हे सारं काही अल्लू अर्जुनने दाखवलं आहे. त्यानंतर तो सेटवर जातो. तर, दिग्दर्शक सुकुमार, ज्यांच्यासोबत ते गेली 20 वर्षे काम करत आहेत. तो अभिनेत्याला सीन समजवून सांगतात. एक सीन देखील शूट करण्यात आला आहे ज्यामध्ये अल्लू अर्जुन लाल चंदनाचे ओंडके त्याच्या स्टाईलमध्ये लॉरीमध्ये ठेवताना दिसत आहे.
‘पुष्पा 2’ चे पोस्ट प्रोडक्शन लवकरच सुरू होणार
रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले आहे की दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांची संपूर्ण टीम ‘पुष्पा 2: द रुल’चे शूटिंग काही आठवड्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.या फिल्मसाठी पोस्ट-प्रॉडक्शन शेड्यूलची देखील योजना करत आहे, जे चित्रपटाच्या शुटिंगनंतर लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात चंदनाच्या तस्करीची संपूर्ण कथा नाटकाच्या रूपात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि शेवटी फहद फासिलच्या एंट्रीने कथेत सिनेमाने रंगत वाढवली होती. आता पार्ट 2 ची कथा अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यातील भांडणापासून सुरू होईल असे सांगण्यात आले आहे.