गायक ए.आर रहमानची मुलगी खतिजा हिचे लग्न खूप चर्चेत होते. ग्रँड वेडिंगमधील खतीजाच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. आता लग्नानंतर खतिजाचे चेन्नईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा खतीजाच्या लूकची चर्चा सुरू झाली आहे.
यो यो हनी सिंगच्या फॅन पेजवरून इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे, जो एआर रहमानची मुलगी खतिजा हिच्या रिसेप्शन पार्टीचा आहे. फोटोमध्ये हनी एआर रहमान आणि त्याच्या कुटुंबासोबत पोज देत आहे. १० जून २०२२ ला रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तिच्या रिसेप्शन पार्टीत खतिजाने पर्पल कलरचा ड्रेस घातला होता, ज्यासोबत तिने मॅचिंग नकाब घातला होता. त्याचवेळी प्रेमळ पती रियासदीन काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये दिसला. ए.आर. रहमान देखील निळ्या कोटसह कुर्ता पायजमामध्ये खूप छान दिसत होता.
खतिजा रहमानच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ए.आर.आर फिल्म सिटीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी बॉलिवूडचे अनेक दिग्गज मुंबईहून पोहोचले आहेत. खतिजा रहमानने ऑडिओ इंजिनियर रियासदीन शेख मोहम्मदसोबत लग्न केले आहे. खतिजा, जी अगदी खाजगी व्यक्ती आहे, तिने सोशल मीडियावर लग्नाची घोषणा केली. स्वतःचा आणि पतीचा फोटो शेअर करत तिने लिहिले, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात प्रतीक्षित दिवस.
गेल्या वर्षी, खतिजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती की, तिची एंगेजमेंट झाली आहे आणि ती लवकरच लग्न करणार आहे. खतिजा यांनी इंस्टा वर लिहिले की, ‘सर्वांच्या आशीर्वादाने, रियासदीन शेख मोहम्मदसोबत माझी प्रतिबद्धता जाहीर करताना मला आनंद होत आहे. तो एक व्यावसायिक आणि ऑडिओ इंजिनियर आहे. माझ्या वाढदिवशी २९ डिसेंबरला जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एंगेजमेंट झाली.