फोटो सौजन्य - Social Media
सध्या सिनेमाघरात अनेक बिग बजेट चित्रपटांनी माहौल बनवले आहे. ‘कल्की 2898 AD’ च्यासह ‘बॅड न्यूज’ने बॉक्स ऑफिसवर कमालीचे प्रदर्शन केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये ‘घरत गणपती’ चित्रपट हल्लीच प्रदर्शित झाला आहे. तसेच बहुतेक मराठी सिनेप्रेमी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत. यादरम्यान हॉलिवूडच्या ‘डेडपूल अँड व्हॉल्व्हरीन’ या मारवेल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. मारवेल चित्रपटांचे चाहते मोठ्या संख्येने ‘डेडपूल अँड व्हॉल्व्हरीन’ पाहण्यासाठी जात आहेत. हे झाले सिनेमाघरातील दृश्य! विशेष म्हणजे ऑगस्ट महिना OTT साठी फार महत्वाचा ठरणार आहे. या महिन्यात OTT वर ऍक्शन आणि रोमान्सचा फूल डोस पाहायला मिळणार आहे.
ऑगस्टच्या ९ तारखेला ‘फिर आई हसीन दिलरुबा’ चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. चित्रपटाचा जॉनर रोमान्स ड्रामा असून सिनेप्रेमींना प्रेमाची अनुभूती देण्यासाठी सिनेमा सज्ज आहे. चित्रपटात सन्नी कौशल दिसून येणार आहे. त्याचबरोबर ९ ऑगस्टला घुडछडी जिओ सिनेमावर लाँच होणार आहे. विशेष म्हणजे सिनेमात मुख्य भूमिकेत संजय दत्त आणि रविना टंडन दिसून येणार आहेत. चित्रपटाचा जॉनर रोमान्स ड्रामा आहे.
राघव जुयालची नवीन वेब सिरीज ‘ग्यारह ग्यारह’ ९ ऑगस्ट रोजी जी5 ला लाँच होणार आहे. राघवची किलमधील परफॉर्मन्स चाहत्यांना खूप भावली होती. त्याचसह सिनेमाघरात आलेली कल्कीची लाट आता OTT वरसुद्धा पाहायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण स्टारर ‘कल्की 2898 AD’ चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्राईम व्हिडियोवर स्ट्रीम केले जाईल. अद्याप अधिकृत नोटीस आली नाही आहे. त्याचबरोबर हॉटस्टारवर ‘लाईफ हिल गई’ नावाची कॉमेडी सिरीज ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून दिव्येंदु शर्मा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.






