आयुष्मान खुरानानं (Ayushmann Khurrana) नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केलाय. आता तो आपल्या कॅामीक टायमींगने प्रेक्षकांना हसवण्यास तयार झाला आहे. त्याचा ‘डॉक्टर जी’ चित्रपट येत्या जाहीर 14 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं फर्स्ट पोस्टरी आज समोर आलं असून,यामध्ये आयुष्मान वैद्यकीय विद्यार्थ्याच्या भुमीकेत दिसत आहे.
[read_also content=”झवेरी बाजार बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत https://www.navarashtra.com/crime/threatened-to-bomb-up-zaveri-bazar-arrested-nrgm-327558.html”]
‘डॉक्टर जी’ चित्रपट जाहीर झाला आहे, तेव्हापासून आयुष्मानचे चाहते आनंदी आहेत. त्याचा नव्यान येणारा हा चित्रपट म्हणजे परिपूर्ण असा कॅामेडी धमाका आहे. या चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत आहेत. आज त्याच्या इंस्टाग्राम अंकाऊट वरून त्याने या चित्रपटाची रिलीज तारीख शेअर केली.
[read_also content=”महाराणी एलिझाबेथ यांच्यावर आज अंत्यसंस्कार, राष्ट्रपती दौपदी मुर्म राहणार उपस्थित https://www.navarashtra.com/world/president-daupadi-muram-will-attend-queen-elizabeths-funeral-today-nrps-327479.html”]
बॉलीवूडमधे वेगवेगळ्या धाटणीच्या भुमिका करणार अभिनेता म्हणून आयुष्यमान खुरानारा ओळखलं जातं. मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग आहे आणि चाहत्यांना त्याला कायम रुपेरी पडद्यावर पाहायला आवडते. यावेळी आयुष्यमान एका हटक्या भुमिकेत दिसणार आहे. डॉक्टर जी चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर झाल्यापासून या चित्रपटानं प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. अनुभूती कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना वैद्यकीय विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. त्याच्या या आगळ्या वेगळ्या भुमीकेसाठी आयुष्मान खुराना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाची रिलीजची तारीख शेअर करताना, आयुष्मानने लिहिले, अपॅाईन्टमेंट घेण्यासाठी सज्ज व्हा. #डॉक्टरजी तुम्हाला 14 ऑक्टोबर 2022 पासून थिएटरमध्ये भेटतील.