सध्या जगभरात एकाच लग्नाच्या प्री वेंडीग सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हा प्री वेंडीग सोहळा म्हणजे प्रसिद्ध उद्योपती मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchent) यांचा. त्यांच्या पहिल्या प्री वेंडीग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये थाटात पारा पडला होता. आता दुसरा सोहळा देखील आलिशान पद्धतीने पार पडताना दिसत आहे. साता समुद्रापार त्यांच्या प्री वेंडीग सोहळ्याला सुरुवात झाली असून गुरुवारी दिवशी प्रसिद्ध म्युझिकल बँड बॅकस्ट्रीट बॅाईजने (Backstreet Boys) धमाकेदार परफॅार्मन्स देत सोहळ्याची शान वाढवली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओही समोर आला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अंनत राधिकाच्या प्री वेंडीगमध्ये या पुर्वी पॅापस्टार रेहानाने धमाकेदार परफॅार्मन्स केलं होतं. यावेळी बॅालिवुडसह, राजकारण, क्रिडा क्षेत्रातील अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला रेहानाने कोट्यावधींच मानधनही घेतल्याची चर्चा होती. आता प्रसिद्ध बॅकस्ट्रीट बॉईजने धमाकेदार परफॅार्मन्स देत या दुसऱ्या प्री वेडींग सोहळ्यालाही चार चांद लावले आहेत.
अनंत राधिकाच्या प्री वेडींग सोहळ्याच्या सेलिब्रेशनसाठी क्रूझवर सेलिब्रेशनसाठी इटलीला गेलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान, त्याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, त्यांची मुलगी राहा कपूर, रणवीर सिंग, करीना कपूर, करिश्मा कपूर, करण जोहर, अनन्या यांचा समावेश आहे. पांडे, जान्हवी कपूर, वडील बोनी कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान आणि दिशा पटानी यांचा समावेश आहे. तसचं सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी उर्फ ओरी आधीच क्रूझवर आहे. अनंत आणि राधिकाची ही दुसरी प्री-वेडिंग बॅश आहे. पहिला मार्चमध्ये गुजरातमधील जामनगर येथे झाला. यात बॉलीवूड, क्रीडा, व्यवसाय आणि राजकारणी उपस्थित होते. जगभरात हा सोहळा चर्चेचा विषय ठरला होता.