ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने (Amazon Prime Video) त्यांचा आगामी क्राईम ड्रामा ‘बंबई मेरी जान’ (Bambai Meri Jaan) या वेबसीरिजची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण10 भागांच्या ॲमेझॉन ओरिजिनल मालिकेचा प्रीमियर भारतात आणि 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर लवकरच केला जाणार आहे. नुकतंच या वेबसीरिजचं (Web Series) पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. वेबसीरिजची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर पोस्टर शेअर करण्यात आल्यानंतर नेटकऱ्यांनी या वेबसीरीजची आतुरतेने वाट बघत असल्याचं सांगितलं आहे. एस. हुसैन झैदी यांच्या कथेवर ही वेबसीरीज तयार करण्यात आली आहे. एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंटचे रितेश सिधवानी, कासिम जगमगिया आणि फरहान अख्तरसह ‘बंबई मेरी जान’ची निर्मिती रेन्सिल डिसिल्वा आणि शुजात सौदागर यांनी केली आहे. तसेच शुजात सौदागरच याचे दिग्दर्शक आहेत. या क्राईम थ्रिलरमध्ये के के मेनन, अविनाश तिवारी, कृतिका कामरा आणि निवेदिता भट्टाचार्य यांच्यासह अमायरा दस्तूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.