बिग बॉस ओटीटी 3 : बिग बॉस ओटीटी 3 मधील (Bigg Boss OTT 3) घरातील सदस्यांमध्ये कोणताही गोंधळ आणि वादविवाद झाल्याशिवाय एकही दिवस गेला नाही. या वादग्रस्त शोमध्ये, हाणामारी आणि शिवीगाळ याने बिग बॉसचे घर चर्चेचे राहिले. एवढेच नव्हे तर मागील आठवड्यामध्ये झालेल्या मारामारीमुळे बिग बॉसच्या टीआरपीचा बाण वर चढतच राहिला. यावेळी, टीव्ही स्टार्ससह, अनेक सोशल मीडिया स्टार सुद्धा शोमध्ये सहभागी झाले आहेत.
शोच्या नियमांनुसार दर आठवड्याला कोणाला तरी घरातून काढून टाकले जाते. अशा परिस्थितीत या आठवड्यात 5 स्पर्धक नामांकनाच्या कोंडीत अडकले होते, त्यापैकी एका सदस्याला कमी मतांमुळे घरी जावे लागले आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात असलेलं आणि घराच्या बाहेर चर्चेत असलेली वडापाव गर्ल (Vada Pav Girl) घराबाहेर पडली आहे असे वृत्त समोर आले आहे.
बिग बॉस ओटीटी सीझन 3 च्या तिसऱ्या आठवड्यात लवकेश कटारिया (Love Kataria), चंद्रिका दीक्षित (Chandrika Dixit), विशाल पांडे (Vishal Pandey), शिवानी कुमारी आणि अरमान मलिक यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट (BBOTT 3 Nomination) करण्यात आले होते. अशा परिस्थितीत शोच्या तिसऱ्या आठवड्यात चंद्रिका दीक्षित उर्फ वडा पाव गर्ल हिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शोचे फॅन पेज आणि बिग बॉसनेही ट्विटरवर ट्विट करून या बातमीला दुजोरा दिला आहे. पाच नामांकित स्पर्धकांमध्ये चंद्रिकाला सर्वात कमी मते मिळाली ज्यामुळे तिला शोमधून अलविदा करावा लागला.
बिग बॉसच्या घरात चंद्रिका दीक्षितचा खेळ लोकांना फारसा आवडला नाही. शनिवारच्या वीकेंड का वारमध्ये अनिल कपूरने अरमान आणि विशाल यांच्यातील थप्पड मारण्याच्या घटनेचा मुद्दा वारंवार उपस्थित केल्याबद्दल चंद्रिकाला फटकारले होते. तुमच्या माहितीसाठी चंद्रिका दीक्षित ही दिल्ली वडा पाव गर्ल म्हणून प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाली आहे. त्याचबरोबर घरामध्ये तिचे फार काही मजबूत असे मत नव्हते. त्याचबरोबर मागील दोन आठवड्यापासून ती होस्ट अनिल कपूरच्या निशाण्यावर सुद्धा होती.