(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भूषण प्रधान हा मराठी आणि नाटक क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.तो आपल्या अभिनयासाठी खूप लोकप्रिय असून तो अनेक प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करतो. भूषणने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तो झळकला आहे. मराठीतील हँडसम चॉकलेट बॉय म्हणून अभिनेत्याकडे पाहिलं जातं.भूषण प्रधान हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून तो नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमी त्याच्या आयुष्यातील अपडेट्स हा चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतीच भूषणने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
Bigg Boss 19 : कुनिका सदानंद पुन्हा साधला अभिषेक बजाजवर निशाणा, म्हणाली – “कोणतेही चांगले कुटुंब…”
भूषण प्रधानने त्याच्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्री केतकी नारायणसोबतचे काही पोस्ट शेअर केले आहेत. या दोघांनीही पारंपारिक लूक केल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. या पोस्टमधील पहिल्या फोटोने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहिला मिळत आहे. या पहिल्या फोटोत केतकीच्या पोटावर भूषणने हात ठेवत मॅटर्निटी फोटोशूटसारखी पोझ दिली आहे. या फोटो शिवाय त्याने दिलेल्या कॅप्शनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “आमच्याकडे एक गोड सरप्राइज आहे”, असं कॅप्शनही त्याने या पोस्टला दिलं आहे. भूषणची ही पोस्ट पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.
‘या’ कारणामुळे Ameesha Patel चे झाले नाही लग्न, ‘अर्ध्या वयाची मुलं आता मला…’ व्यक्त केली खंत
या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.”एक मिनिट तुझं लग्न कधी झालं?”, “हे कधी घडलं?”,”फोटो बघून नक्की काय ठरवायचं लग्न झालं आहे की बाळ होणार आहे” अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या असून काही जणांनी त्या दोघांना अभिनंदन देखील केलं आहे. तर काहींना वाटतं की कदाचित हे एक प्रमोशनच्या भागातलं असावं. अश्या अनेक कमेंट्स प्रेक्षकांच्या बघायला मिळत आहेत. त्यामुळे नक्की प्रमोशन शूट आहे की खरच काही गुडन्यूज आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती मिळाली नाही. पण त्याच्या या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढवली आहे.