अभिजित सावंतने सांगितला 'इंडियन आयडॉल' दरम्यानचा खास किस्सा
बॉलिवूड इंडस्ट्रीतला लोकप्रिय गायक अभिजित सावंत सध्या बिग बॉसचं घर चांगलंच गाजवत आहे. अभिजित सावंत पहिल्या दिवसापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिजितने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्या मुलाखती दरम्यान त्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबतचा एक किस्सा शेअर केला आहे. ‘इंडियन आयडॉल’च्या दरम्यानचा किस्सा अभिजित सावंतने मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
मुलाखती दरम्यान अभिजित सावंतने सांगितले की, “उद्धवजींनी मला गेल्या काही दिवसांपूर्वी एक जुना किस्सा सांगितला. ‘इंडियन आयडॉल’ सुरु होतं. त्यांच्या मीटिंग्स सुरु राहायच्या. मीटिंगमध्ये चर्चा सुरू असताना त्यांनी खास माझ्यासाठी फोन काढून लपून वोट केलं आहे. महत्वपूर्ण विषयावर मीटिंग असतानाही त्यांनी मला वोट केलं आहे. पण मुख्य गोष्ट म्हणजे, त्यांनी केव्हाच प्रेशर वैगेरे टाकलं नाही. कारण एकाच शोमध्ये, तीन मराठी गायक होते. पण माझ्यापेक्षा व्हॅल्य राहूल वैद्यला होती. पण त्यांनी असं केव्हा दबाव टाकून काम केलं नाही.”
हे देखील वाचा – राष्ट्रीय पुरस्कार विजेता डीएसपीचा भारत दौरा, हैदराबाद नंतर कोणत्या शहरात जाणार ?
२००५ मध्ये झालेल्या ‘इंडियन आयडॉल’चा अभिजित सावंत विजेता ठरला होता. यानंतर त्याला अनेक अल्बममध्ये आणि बॉलिवूड मराठी चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. त्याचं ‘मोहब्बत लुटाऊंगा’ हे गाणं सर्वाधिक हिट झालं. या गाण्याने अभिजितला देशभरात प्रसिद्धी मिळाली. सध्या ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये अभिजित सावंत चांगलाच चर्चेत राहिलेला स्पर्धक आहे. विशेष म्हणजे तो बिग बॉसच्या घरात क्रांती करताना दिसत आहे. त्यासोबतच अन्यायाविरूद्ध आवाज आणि रोखठोक वृत्तीमुळे तो चांगलाच चर्चेत आहे. अभिजीत सावंतच्या रियल लाईफविषयी सांगायचे तर, त्यांचं लग्न झालं असून त्याला दोन मुली आहेत.