राजकुमार राव घरासाठी भरतोय EMI, सांगितली खरी परिस्थिती...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा आगामी चित्रपट ‘स्त्री’चा सिक्वेल लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. दिनेश विजन निर्मित ‘स्त्री’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण प्रेक्षकांना भरपूर आवडले होते. समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत ‘स्त्री’ या चित्रपटाचे खूप कौतुक देखील करण्यात आले. मात्र, चित्रपटाच्या शेवटी सस्पेन्स दाखवण्यात आला होता, तेव्हापासून प्रेक्षक ‘स्त्री 2’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांची ही प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपणार आहे. खरं तर, ‘स्त्री 2’ स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार-विजेता अभिनेता राजकुमार राव प्रेक्षकांना ‘स्त्री 2’ ची तिकिटे बुक करण्यासाठी सगळ्यांना आणखी एक खास कारण दिले आहे. सर्वात अष्टपैलू अभिनेता राजकुमार रावचा हा वर्षातील दुसरा चित्रपट हिट ठरणार आहे. ‘आज की रात’ या गाण्याने सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. आणि तसेच आता अभिनेत्याने या चित्रपटामधील ‘आयी नई’ नावाचे नवीन गाणे शेअर केल आहे ज्यामध्ये अभिनेत्याचे नृत्य कौशल्य दिसली आहेत. सचिन-जिगरच्या रचनेत हा अभिनेता मनापासून नाचताना दिसत आहे ज्यामध्ये श्रद्धा कपूर झळकली आहे.
‘स्त्री 2’ केवळ रावचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरणार नाही, तर हा अभिनेता बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवताना दिसणार आहे. या वर्षात राजकुमार राव हा वेगवेगळ्या भूमिकेत पात्र साकारताना दिसला. त्याने ‘श्रीकांत’ मध्ये एका दृष्टिहीन उद्योगपतीची भूमिका साकारली आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये उत्कृष्ट भूमिका साकारली तर आता या चित्रपटामध्ये बिकी च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. या तीन चित्रपटांमधील रावच्या तीन वेगळ्या भूमिका या अभिनेत्याच्या अष्टपैलुत्वाचा पुरावा आहेत आणि त्याला सर्वात पॉवर-पॅक कलाकार म्हणून देखील नावाजले जात आहे.
अनेकजण ‘श्रीकांत’ मधील रावच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी उत्सुक असताना, ‘स्त्री 2’ सोबत बॉक्स ऑफिसवर अभिनेता हॅट्रिक करेल अशीही त्यांची अपेक्षा आहे. मॅडॉक फिल्म्सच्या प्रोजेक्टच्या पलीकडे, राव 11 ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपमधून प्रेक्षकांना दिसणार आहे.