बऱ्याच दिवसांनी अजय देवगण आणि तब्बूची जोडी पडद्यावर परतली आहे. ‘दृश्यम’, ‘दृष्यम 2’, ‘भोला’ आणि ‘दे दे प्यार दे’ नंतर हे दोघेही ‘औरों में कहा दम था’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकत्र दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. या चित्रपटात जिमी शेरगिल, शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांच्या मुख्यभुमिका चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा अशी आहे की कृष्णा आणि वसुधा नावाची दोन पात्रे एकमेकांवर खूप प्रेम करतात. जे पात्र अजय देवगण आणि तब्बूने साकारले आहे. एका घटनेनंतर हे गोघेही वेगळे होतात. कृष्णाला तुरुंगात जावे लागते आणि ही प्रेमकथा काही काळ थांबते. कृष्णाची छोटी आवृत्ती शंतनू माहेश्वरीने आणि वसुधाची भूमिका सई मांजरेकरने केली आहे. यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Wow…Just Wow. 😍#AjayDevgn and #Tabu paired opposite each other and this ‘Diljale’ wali feeling 👏@ajaydevgn and Tabu are back with a love story in acclaimed writer and director #NeerajPandey‘s #AuronMeinKahanDumTha.
The makers have released the first glimpse of the film… pic.twitter.com/BK96oeZ3gz
— Ashwani kumar (@BorntobeAshwani) May 31, 2024
या चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रया
एक्स या अकाउंटवर चित्रपटाबद्दल चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटल याबद्दल त्यांनी आपले मत मांडले आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले, “वाह…बस व्वा. अजय देवगण आणि तब्बूची जोडी एकत्र आहे आणि ही ‘दिलजले’ भावना आहे. अजय देवगण आणि तब्बू एका प्रेमकथेसह परत येत आहेत. दिग्दर्शक नीरज पांडेचा हा चित्रपट उत्कृष्ट आहे.” असे या युजर्सने लिहिले. आणखी एका युजर्सने ट्विट केले की, “मला वाटत नाही की लोक अजयचा हा अवतार स्वीकारतील. तसेच, चित्रपटात तब्बूसोबत खूप जवळीक आहे.” असे त्याने यामध्ये लिहिले.
हे देखील वाचा- ‘स्त्री 2’ मधील ‘आयी नई’ गाणं झाले रिलीज, पॉवरहाऊस राजकुमार रावने केले दमदार नृत्य!
आरडी नावाच्या युजरने ट्विट करत चित्रपटाचे कौतुक केले. ‘औरों में कहाँ दम था’ हा खूप चांगला चित्रपट आहे. चित्रपटाचे संगीत हा त्याचा यूएसपी आहे. अजय देवगण आणि तब्बूची स्क्रीन प्रेझेन्स पाहून मज्जा आली. क्लासिक चित्रपट.” असे या युजर्सने लिहिले. अजय देवगणची स्क्रीन प्रेझेन्स हा सिनेमाचा एक मजबूत भाग आहे. ॲक्शनप्रेमींसाठी हा चित्रपट चांगला आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात जाणून पाहण्यात वेगळीच मज्जा आहे.