राधिका मदन (फोटो सौजन्य-Instagram)
राधिका मदान ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. राधिकाने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच ती अंग्रेजी मीडिअम आणि शिद्दत या चित्रपटामधून प्रसिद्ध झाली. राधिका मदानने अनेक हिंदी मालिकेमध्ये सुद्धा काम केले आहे. आणि आता ती अक्षय कुमारसह ‘सरफिरा’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. अक्षयसोबत ती सुद्धा मुख्यभिमकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती ‘राणी’ चे पात्र साकारत असून, या मध्ये ती अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
वास्तविक जीवनातील कथेवर आधारित, या चित्रपटात राधिका मदन राणीच्या भूमिकेत असून तिची भूमिका ही एक आकर्षक मराठी पात्र साकारणारी आहे. हे नाकारता येत नाही की तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी राधिका नेहमी दिलेल्या व्यक्तिरेखेचे स्वरूप जाणून घेते आणि यावेळी तिने संपूर्ण महाराष्ट्रीयन मुलीचे पात्र हाती घेतले आणि संस्कृतीची सत्यता समोर पडद्यावर आणली आहे.
अक्षयने राधिकाच्या अभिनयाचे केले कौतुक
भव्य थिएटर रिलीजच्या अपेक्षेने, निर्मात्यांनी विविध शहरांमध्ये स्क्रीनिंग आयोजित केले आहेत, ज्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात एका स्क्रिनिंगदरम्यान अक्षय कुमारने राधिका मदानच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसला असून, तो म्हणाला की, “हा माझा आत्तापर्यंतचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय आहे. तुम्हा सगळ्यांना तिच्याबद्दल काय वाटतं हे मला माहीत नाही. ती महाराष्ट्रीयन नाही, पण तिने महाराष्ट्रीयन असल्यासारखा अभिनय केला आहे. ती खूप छान बोलते. तिची भाषा खूप चांगली होती आणि हेच तिने केले, मराठी कसे बोलावे आणि काय बोलावे हे ती पूर्णपणे शिकली. अश्या बोलून अभिनेता अक्षयने तिचे कौतुक केले.
अक्षय कुमारच्या शब्दांतून राधिकाची अभिनेत्री म्हणून झालेली वाढ खरोखरच दिसून आली आहे. तिच्या भूमिकांबद्दलच्या वचनबद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राधिकाने पुन्हा एकदा राणीच्या भूमिकेतून तिची योग्यता सिद्ध केली आहे. 12 जुलै 2024 रोजी भव्य थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या या बहुप्रतिक्षित चित्रपटात तिला राणीच्या रूपात पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. आन या चित्रपटाची वाट पाहत आहेत.