Sarfira Film (फोटो सौजन्य- Instagram)
बॉलीवूड इंडस्ट्रीचा ॲक्शन स्टार अक्षय कुमार एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. परंतु आता अक्षय कुमारचा 2024 चा दुसरा चित्रपट ‘सरफिरा’ रिलीजसाठी सज्ज आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला असून, ‘सरफिरा’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार कमी किमतीची एअरलाइन सुरू करण्यासाठी संघर्ष करताना दिसणार आहे.
आयएमडीबीच्या यादीत पहिले स्थान
‘सरफिरा’ या चित्रपटाचा प्रचार सध्या सर्वत्र जोरदार सुरु आहे. ‘सरफिरा’ या चित्रपटाने सर्वात उत्कंठावर्धक चित्रपट म्हणून आयएमडीबीच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘सरफिरा’चा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाल्याच्या २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आयएमडीबी च्या रेटिंगनुसार, ‘सरफिरा’ हा जुलै २०२४ चा सर्वात जास्त पाहिला जाणारा चित्रपट आहे. याने इंडियन 2 आणि बॅड न्यूज या चित्रपटांना मागे टाकत पाहिले स्थान पटकावले प्राप्त केले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, “हा माझा 150 वा चित्रपट आहे आणि हा माझा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. मला हा चित्रपट आणि त्यात भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी सुधाचा खूप आभारी आहे. असे तो म्हणता दिसला आहे.
‘सरफिरा’ ची कथा
सरफिरा हा जीआर गोपीनाथ यांच्या खऱ्या जीवनातील कथेवर आधारित आहे. ज्यांचा सर्वसामान्यांसाठी किफायतशीर विमान वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी मोठा हात आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित हा चित्रपट 5 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सूरराई पोत्रू या चित्रपटाचे अधिकृत रूपांतर केले आहे. सुधा आणि शालिनी उषादेवी यांनी ही कथा लिहिली असून, या चित्रपटाचा संवाद पूजा तोलानी आणि जी.व्ही. प्रकाश कुमार यांच्या संगीतासह झाला आहे. सरफिराची निर्मिती अरुणा भाटिया (केप ऑफ गुड फिल्म्स), दक्षिण सुपरस्टार सूर्या आणि ज्योतिका (2डी एंटरटेनमेंट) आणि विक्रम मल्होत्रा (अबंडंटिया एंटरटेनमेंट) यांनी केली आहे. 12 जुलै रोजी देशभरात प्रदर्शित होणारा, ”सराफिरा” आपल्या दमदार कथेने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे.






