(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
एआर रहमान हे आज देशातील महान संगीतकारांपैकी एक मानले जातात. पण एक काळ असा होता तेव्हा संगीतकाराचे नाव आजच्यासारखे लोकप्रिय नव्हते. याबद्दलच प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. अलका याज्ञिकने सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा ती आणि कुमार सानू एआर रहमानसोबत काम करण्यास आतुर होती. मात्र, नंतर दोघांनाही त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप झाला.
रहमानसोबत काम करण्यास दिला होता नकार
रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत अलका याज्ञिकने सांगितले की, ‘सुरुवातीच्या काळात लोक रेहमानला इंडस्ट्रीत फारसे ओळखत नव्हते, तर दक्षिणेत त्याचे चांगले नाव होते. ‘मला अजूनही आठवते की चेन्नईहून रहमानचा फोन आला होता ज्याने मला सांगितले की तो माझा खूप मोठा चाहता आहे आणि मला आणि कुमार सानूसोबत एक संपूर्ण साउंड ट्रॅक बनवायचा आहे. रहमान या चित्रपटासाठी गाणी तयार करत होते.’ असं ती म्हणाली.
तारखा मिळाल्या नाहीत
अलका याज्ञिक पुढे म्हणाल्या की, तो एका चित्रपटासाठी गाणी बनवत आहे. मी आणि कुमार सानूने चित्रपटासाठी गावे अशी त्याची इच्छा आहे. पण प्रॉब्लेम असा होता की, ते लगेच बोलवण्यासाठी मला फोन करत होते. पण, माझ्या तारखा आधीच बुक झाल्या होत्या. तसेच मुंबईत मी इतक्या संगीतकारांसोबत काम केले आणि माझा रेपो बनवला होता की, मला त्यांना सोडायचे नव्हते. तसेच त्यावेळी मला एआर रहमान कोण हे माहित नव्हते. मला त्यांची क्षमता माहित नव्हती.’ असं ती म्हणाली.
कुमार सानू यांनी ही दिला होता नकार
त्यानंतर अलका यांनी कुमार सानू यांना फोन केल्याचे सांगितले. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनाही चेन्नईहून फोन आल्याचे समजले. कुमार सानू यांनी अलका याज्ञिक यांना सांगितले की, त्यांनी चेन्नईला जाण्यास नकार दिला आहे. त्यांच्या तारखा बुक झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. यानंतर अलका याज्ञिक यांनीही चेन्नईला जाण्यास नकार दिला.
हे देखील वाचा- अलका याज्ञिक दुर्मिळ आजारानं त्रस्त, दोन्ही कानांनी ऐकू येणं झालं बंद
अलकाला नंतर पश्चाताप झाला
यानंतर गायिका अलका याज्ञिक म्हणाली की, ‘नंतर जेव्हा मी त्यांची गाणी ऐकली तेव्हा मला भिंतीवर डोके आपटून घ्यावे वाटत होते. ती गाणी किती सुंदर होती.’ यानंतर अलका याज्ञिक यांनी एआर रहमान यांच्यासोबतच्या पहिल्या कामाची आठवण सांगितली. एआर रेहमान अलका यांना भेटताच म्हणाले की, तुम्ही माझी जुनी गाणी गायली नाहीत. यावर अलका याज्ञिक म्हणाल्या की, ‘मला माझीच खूप लाज वाटली. मला स्वत:ला कुठेतरी गप्प व्हावं वाटत होतं. तो पूर्णपणे माझा तोटा होता.’ असं त्यांनी सांगितले.