Anil Kapoor (फोटो सौजन्य -Instagram)
अनिल कपूर होस्ट करत असलेला ‘बिग बॉस OTT ३’ हा शो सध्या भरपूर चर्चेत दिसत आहे. अनिल कपूर हा शो होस्ट करत असल्याने यातली मज्जा अजून वाढली आहे. तसेच या शो ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. ‘बिग बॉस OTT 2′ पेक्षा तीन आठवड्यांच्या आत तिसऱ्या सीझनने 30.4 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. या शोच्या OTT आवृत्तीमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. Ormax च्या सर्वेक्षण अहवालानुसार, ‘बिग बॉस OTT 2’ च्या तुलनेत अनिल कपूर-होस्ट शोने त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये तब्बल 5.3 दशलक्ष व्ह्यूज नोंदवले ज्यांनी आधी 2.4 दशलक्ष व्ह्यूज मिळवले होते.
इतकेच नाही तर ‘बिग बॉस ओटीटी ३’ ला तीन आठवड्यांत ४२% जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सिनेमा आयकॉन अनिल कपूरने होस्ट केलेल्या तिसऱ्या सीझनने ‘बिग बॉस OTT 2’ ने मिळवलेल्या एकूण व्ह्यूजपैकी जवळपास ४२% आकर्षित केले आहेत, जे या वेळी प्रेक्षकांना शो पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व घ्यावे लागले हे लक्षात घेऊन प्रभावी आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणे असो किंवा होस्टच्या विश्वात पदार्पण करणे असो अभिनेता अनिल कपूर कायम प्रेक्षकांना मोहित करतात.
‘बिग बॉस ओटीटी 3’ होस्ट म्हणून पदार्पण केलेल्या अनिल कपूरने शोमध्ये वेगळीच जादू निर्माण केली आहे. त्याचा फिटनेस आणि स्टाइल अनेकदा त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शो होस्ट करण्याव्यतिरिक्त अनिल कपूर ‘सुभेदार’ मध्ये निर्दोष परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे, जो त्याचा दिग्दर्शक सुरेश त्रिवेणीसोबतचा पहिला प्रोजेक्ट आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याचे देखील चर्चा होत आहे.