खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून झालेल्या एसआयआरवर टीका केली. तसेच बिहार आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाली असल्याचा आरोप केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! ज्यांच्या विजयाची खात्री होती त्यांना 50 च्या आत संपवले!’ असा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते. ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50 च्या आत संपवले!’ असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले! — Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून बिहारच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे यांनी कॉंग्रेस पक्षाला घराचा आहेर दिला. अंबादास दानवे म्हणाले की, पराभव झालेला मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते, अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली.






