धावपळीच्या जगात रोजच्या जेवणातून पाहिजे तसं पोषक घटक मिळत नाहीत.त्यामुळे अनेकदा कमी वयातच शरीराची दुखणी सुरु होतात. पुर्वीच्या काळी पाहायला गेलं तर, पायांची दुखणी असो किंवा हाडांचा त्रास हे वयाच्या साठीच्या पुढचे आजार मानले जात होते. मात्र आता तरुण वयातच पाय दुखणं, पायांना सुज येणं यासारखे त्रास जाणवतात. याला अनेक कारणं आहेत. धावपळीचं आयुष्य, जेवणाच्या आणि झोपण्याच्या अनियमित वेळा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे व्हिटामीन्सची असलेली कमतरता.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीराला पाहिजे असणारी पोषक तत्व किंवा व्हिटामीन्य मिळाली नाही तर कोणते ना कोणते किरकोळ किंवा गंभीर आजार होतात. त्य़ापैकीच एक म्हणजे सतत पाय दुखणं किंवा पायांच्या संबंधित समस्या होणं. हा आजार तुमच्या शरीरातील व्हिटामीन B 12 ची कमतरता असल्याचे संकेत आहेत.
पाय दुखणं आणि सुज येणं ही दोन सामान्य परंतु गंभीर लक्षणं आहेत. अनेक वेळा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण यामागे काही महत्त्वाची कारणं देखील आहेत. एक म्हणजे व्हिटामिन B12 ची कमतरता. शरीरातील नसांच्या कार्यासाठी B12 अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हे व्हिटामिन कमी झालं की स्नायूंमध्ये आणि नसांमध्ये दाह, कमजोरी आणि वेदना जाणवू शकतात .B12 कमी झाल्यावर शरीरातील नर्व्ह सिग्नल योग्य पद्धतीने काम करत नाहीत, त्यामुळे पायात चुबी, झिणझिण्या, जडपणा, तसेच सतत दुखणे अशा तक्रारी दिसतात. काही लोकांमध्ये वेदना सतत राहतात, तर काहींना चालताना किंवा जास्त उभं राहिल्यावर त्रास वाढतो. B12 कमी झाल्यामुळे रक्तनिर्मितीची प्रक्रिया कमकुवत होते, त्यामुळे थकवा आणि स्नायूंमध्ये ताण जाणवतो.
पायाला सुज येणं फक्त B12 कमी झाल्यामुळे होत नाही. सुज येण्याची प्रमुख कारणे म्हणजे अॅनिमिया, थायरॉईडचे विकार, किडनीतील अडचणी, जास्त मीठ सेवन, दिवसातून जास्त वेळ बसून राहणं किंवा उभं राहणं तसंच रक्ताभिसरण कमी होणं. B12 कमी असल्यामुळे शरीर कमकुवत होऊन सुज जास्त जाणवू शकते, म्हणून ही दोन्ही लक्षणे एकत्र दिसतात.
या तक्रारी वारंवार होत असल्यास काही तपासण्या करणे आवश्यक असते—CBC, Vitamin B12, Vitamin D3, TSH आणि Kidney Function Test. या रिपोर्ट्समुळे नेमकं कारण स्पष्ट होतं. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरेजचं आहे. B12 गोळ्या किंवा इंजेक्शन, योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल यांचा समावेश असतो. दूध, दही, अंडी, पनीर, मासे यांसारख्या पदार्थांमधून B12 मिळू शकतं. पाय उचलून ठेवणे, गरम पाण्यात मीठ टाकून पाय बुडवणे आणि व्यायामदेखील सुज व वेदना कमी करतात.सतत पाय दुखणे व सुज येणे ही किरकोळ लक्षणे नाहीत; योग्य तपासणी आणि लवकर उपचार केल्यास हा त्रास सहज नियंत्रित होऊ शकतो, वारंवार डॉक्टरांकडून सांगितलं जातं.
Ans: व्हिटामीन B 12 ची कमतरता असल्यावर सतत पाय दुखतात.
Ans: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, अनियमित आहार, झोपेचा अभाव आणि शरीराला मिळणारी पोषक तत्वांची कमतरता यामुळे तरुणांमध्येही हे त्रास वाढले आहेत.
Ans: ही लक्षणे शरीरातील व्हिटामिनची कमतरता किंवा इतर गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता तपासणी व उपचार आवश्यक आहेत.






