तामीळनाडूमध्ये प्लेन क्रॅश (फोटो- istockphoto)
तामिळनाडूमध्ये Indian Air Forche चे प्लेन क्रॅश
चेन्नईमधील बेसिक ट्रेनर प्लेन क्रॅश
कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे देण्यात आले आदेश
तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन एअर फोर्सचे एक ट्रेनर प्लेन क्रॅश झाले आहे. भारतीय हवाई दलाचे पीसी-७ पिलाटस बेसिक ट्रेनर विमान कोसळले आहे. हे विमान प्रशिक्षण उड्डाणावर होते आणि चेन्नईतील तांबरमजवळ क्रॅश झाले आहे. घटना घडत असताना पायलट सुखरूप बाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे.
Tambram Chennai PC 7 trained aircraft of IAF crashed, pilot safely ejected. pic.twitter.com/uWE148euTN — War & Gore (@Goreunit) November 14, 2025
चेन्नई येथील तांबरम या भागात इंडियन एअर फोर्सचे विमान कोसळले आहे. हे एक ट्रेनर विमान असल्याचे समोर आले आहे. पायलट सुखरूपपणे यातून बाहेर पडला आहे. भारतीय वायु सेनेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. इंडियन एअर फोर्सचे पीसी-७ पिलाटस बेसिक ट्रेनर विमान कोसळले. हे विमान एअरफोर्सच्या कॅडेटना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाते. ही घटना घडताच तत्काळ या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली.
हा अपघात कसा घडला याची चौकशी करण्यासाठी इंडियन एअरफोर्सने कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. पायलट वेळीच विमानातून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.






