Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Kapoor New Show : अनिल कपूर होस्ट करणार नवा शो ‘इंडिया के टॉप 1%’; लवकरच स्टार प्लसवर

India Ke Top 1% : स्टार प्लस लवकरच ‘इंडिया के टॉप 1%’ हा नवा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या शोचे सूत्रसंचालन Anil Kapoor करणार असून स्पर्धकांच्या लॉजिक, निरीक्षणशक्ती आणि झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेची कसोटी लागणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 13, 2026 | 08:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेची परीक्षा घेणार आहे.
  • अनिल कपूर यांच्या सूत्रसंचालनामुळे ‘इंडिया के टॉप 1%’ या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
  • अनोखा शो लवकरच स्टार प्लसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Anil Kapoor New Show : टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि रोमांचक अनुभव घेऊन स्टार प्लस लवकरच ‘इंडिया के टॉप 1%’ हा नवा रिअॅलिटी शो सादर करणार आहे. या शोचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर करणार आहेत. पारंपरिक क्विझ शोच्या चौकटीबाहेर जाऊन तयार करण्यात आलेला हा शो स्पर्धकांच्या लॉजिक, ऑब्झर्वेशन, मानसिक चपळाई आणि झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेची परीक्षा घेणार आहे.

Maa Hai Na: शिल्पा शेट्टी आणि सेलिब्रिटी आईंसह करत आहेत धमाल, हिंदी ZEE5 वरील ‘माँ है ना’ पाहण्याची ५ कारणे

आजच्या माहितीप्रधान युगात केवळ पाठांतरावर आधारित ज्ञान पुरेसे नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे. ‘इंडिया के टॉप 1%’मध्ये स्पर्धकांना विविध आव्हानांचा सामना करावा लागेल. या आव्हानांमधून त्यांची विचारशक्ती, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, पॅटर्न ओळखण्याचे कौशल्य आणि दबावाखाली शांत राहण्याची ताकद तपासली जाईल. स्पर्धा जसजशी पुढे सरकेल, तसतसे अधिक कठीण टप्पे पार करत केवळ सर्वोत्कृष्ट स्पर्धकच अंतिम फेरीपर्यंत पोहोचतील.

या शोबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले, “भारत हा अशा लोकांचा देश आहे ज्यांच्याकडे नैसर्गिक बुद्धिमत्ता, निरीक्षणशक्ती आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची अद्भुत क्षमता आहे. आपल्या देशातील अनेक लोक जीवनातील अनुभवातून शिकतात आणि त्यांची हीच ताकद त्यांना वेगळे बनवते. आपण ‘जुगाड’ करण्याच्या क्षमतेचा अभिमान बाळगतो आणि तीच आपली खरी सुपरपॉवर आहे.”

ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी ‘इंडिया के टॉप 1%’चा फॉरमॅट पाहिला तेव्हा तो मला खूप वेगळा आणि उत्सुकता वाढवणारा वाटला. हा शो स्पर्धकांना माहितीवर आधारित प्रश्न विचारत नाही, तर त्यांचा मेंदू दबावाखाली किती प्रभावीपणे काम करतो, याची परीक्षा घेतो. हा मंच भारतीयांच्या विचारशक्तीला आणि कॉमन सेन्सला योग्य न्याय देणारा आहे.”

Kareena Kapoor : ‘नवी आवृत्ती पण चेहरा तोच परंतु झळकणार नव्या तेजाने’, ‘या’ प्रसिद्ध Diamond कंपनीचा फेस म्हणून करीना कपूर कायम!

स्टार प्लसवर प्रसारित होणारा ‘इंडिया के टॉप 1%’ हा शो प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारा अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. अनिल कपूर यांच्या दमदार उपस्थितीमुळे शोबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Anil kapoor to host new show indias top 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Reality Show
  • Show Cause Notice
  • Television Shows

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.