Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहलगाम हल्ल्यानंतर Arijit Singh ने चेन्नईतील संगीत कार्यक्रम केला रद्द, काय म्हणाला गायक?

लोकप्रिय गायक अरिजित सिंगने त्याचा चेन्नईतील कार्यक्रम रद्द केला आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर अरिजीतने हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देश सध्या निर्दोषांना न्याय मिळावा अशी मागणी करत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 25, 2025 | 08:52 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दुःखी आहे. सर्वांना या हल्ल्याचा बदला घ्यायचा आहे. त्या निष्पाप लोकांना न्याय द्या अशी मागणी सगळे करत आहेत ज्यांची कोणतीही चूक नव्हती. दरम्यान, आता अरिजीत सिंगने त्याचा चेन्नईतील संगीत कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर गायकाने हा निर्णय घेतला आहे. अरिजीत सिंग यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. तसेच याबद्दल गायक काय म्हणाला जाणून घेऊयात.

अरिजीत सिंगने शेअर केली पोस्ट
खरंतर, अरिजीत सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, गायकाने माहिती दिली की पहलगाममधील अलिकडच्याच दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, आयोजक आणि कलाकारांनी एकत्रितपणे या रविवारी, २७ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये होणारा आगामी संगीत कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गायक आणि आयोजकांनी सर्व तिकीट धारकांना पैसे परत करण्याची मागणी देखील केली आहे. ही माहिती गायकाने सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना दिली आहे.

वयाच्या १८ व्या वर्षी केला संघर्ष, पहिलं गाणंही झालं नाही रिलीज, अशाप्रकारे क्षणात बदलले Arijit Singh चे नशीब!

तसेच, अरिजीत सिंगचा वाढदिवस देखील आहे. आज २५ एप्रिल रोजी, हा गायक त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अरिजीत सिंगने आज आपल्या मेहनतीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. केसरी’, ‘सतरंग’, ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘चन्ना मेरेया’ सारख्या असंख्य गाण्यांना आपला आवाज देणारा गायक अरिजित सिंग आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

गायकाने संगीत कार्यक्रम केला रद्द
तो म्हणाला की, ‘सर्वांना लवकरच परतफेड मिळेल. इतर कोणत्याही माहितीसाठी तुम्ही events@district.in वर विचारू शकता. आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.’ पहलगाममधील हल्ल्यानंतर अरिजीत सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे हे उल्लेखनीय आहे. या हल्ल्यानंतर अनेक गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत कारण पुन्हा एकदा काश्मीरमधील निष्पाप आणि निर्दोष भारतीयांवर हल्ला करण्यात आला आहे.

गुंतागुंतीचे पात्र आणि तितकीच हिडन स्टोरी ! सोनी लिव्हच्या आगामी सिरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा

पहलगाममध्ये नेमकं काय घडले?
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये काही दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली आहे. पहलगामच्या भूमीवर हिंदूंचे रक्त सांडले गेले आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशावर पडला आहे. कोणीही कल्पना नसताना जे लोक सहलीला गेले होते किंवा कुटुंबासोबत आनंद साजरा करत होते त्यांच्यावर असा हल्ला केला जाईल याचा विचार देखील कधी मनात आला नव्हता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे, लवकरच भारत या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार आहे.

Web Title: Arijit singh cancels chennai concert pahalgam terrorist attack in jammu kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • Arijit SIngh
  • Bollywood
  • entertainment
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा
1

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral
2

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
3

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
4

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.