(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘केसरी’, ‘सतरंग’, ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘चन्ना मेरेया’ सारख्या असंख्य गाण्यांना आपला आवाज देणारा गायक अरिजित सिंग आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. या गायकाची गणना बॉलिवूडमधील टॉप गायकांमध्ये केली जाते. अरिजीतच्या गायनाचे चाहते केवळ देशातच नाही तर परदेशातही आहेत. आज २५ एप्रिल रोजी, हा गायक त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अरिजीत सिंगने आज आपल्या मेहनतीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. आज या गायकाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.
रिॲलिटी शोमधून बाहेर काढण्यात आले
२५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथे जन्मलेल्या अरिजित सिंगला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे. त्यानेही सुरुवातीपासूनच ते शिकायला सुरुवात केली. यानंतर, त्याने २००५ मध्ये ‘फेम गुरुकुल’ या गायन रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला. शोमध्ये त्याच्या गायनाने त्याने परीक्षकांची मने जिंकली, परंतु त्याला लोकांकडून कमी मते मिळाली आणि तो शोमधून बाहेर पडला. आणि हे घडल्यानंतर अरिजितने हार मानली नाही.
Aditya Dhar यांनी पहलगाम हल्ल्यावर शेअर केली पोस्ट, इंटरनेटवर उडाली खळबळ!
संजय लीला भन्साळींकडून मिळाली ऑफर
जरी अरिजित सिंग त्या रिॲलिटी शोचा विजेता होऊ शकला नाही, तरी त्या काळातील बॉलिवूडमधील सर्वात मोठे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला एक गाणे गाण्याची ऑफर दिली होती. भन्साळींनी अरिजित सिंगला ‘सावरिया’ चित्रपटातील ‘यून शबनमी’ हे गाणे गाण्यास सांगितले, परंतु नंतर पटकथा बदलण्यात आली आणि ते गाणे रिलीज झाले नाही.
दुसरा रिॲलिटी शो जिंकला अरिजित
‘फेम गुरुकुल’ नंतर, अरिजीतने ‘१० के १० ले गये दिल’ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि तो शोचा विजेताही बनला. हा शो जिंकल्यानंतर, त्याला १० लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली, ज्यातून त्याने एक संगीत स्टुडिओ सुरू केला आणि तो संगीत निर्माता बनला. यानंतर त्याने जाहिराती, वृत्तवाहिन्या आणि रेडिओ स्टेशनसाठी संगीत आणि गायन सुरू केले. आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
Badshah: पहलगाममधील क्रूर हल्ला पाहून बादशाहचे तुटले हृदय, रॅपरने संगीत लाँचची डेट ढकलली पुढे!
अरिजीत सिंगने त्याच्या सुरुवातीच्या संगीत कारकिर्दीचे काही दिवस शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर, मोंटी शर्मा आणि प्रीतम यांसारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी संगीत प्रोग्रामर आणि संगीत निर्माता म्हणून घालवला. यानंतर त्याचे अनेक गाणी रिलीज होऊ लागले आणि प्रेक्षकांना ते खूप पसंतीस पडले. आता या गायकाचा मोठा चाहता वर्ग आहे.
या गाण्याने बदलले नशीब
२०११ मध्ये आलेल्या ‘मर्डर २’ या चित्रपटातून अरिजीत सिंगने बॉलिवूडमध्ये गायक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ या गाण्याला त्यांनी आवाज दिला. लोकांना हे गाणे खूप आवडले, पण ‘आशिकी २’ ने त्याला ओळख दिली. या चित्रपटातील ‘मेरी आशिकी तुम ही हो’ या गाण्याला त्याने आवाज दिला आणि येथून त्याचे नशीब बदलले आणि त्यानंतर या गायकाने कधीही मागे वळून पाहिले नाही. आणि अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूड इंडस्ट्रीला दिली.