गुंतागुंतीचे पात्र आणि तितकीच हिडन स्टोरी ! सोनी लिव्हच्या आगामी सिरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा
सोनी लिव्हवरील आगामी डॉक्यूमेण्टरी-ड्रामा ‘ब्लॅक व्हाइट अँड ग्रे – लव्ह किल्स’ येत्या 2 मे रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रोमांचक कथानक आणि नैतिकदृष्ट्या गुंतागगूंतीच्या पात्रांसह ही सिरीज प्लॅटफॉर्मवरील बहुप्रतिक्षित बनली आहे.
ही सिरीज रीलीज होण्यापूर्वीच कलाकारांना प्रेक्षकांकडून अनेक संदेश मिळत आहेत, जे या सिरीजमधील मुख्य रहस्याचा उलगडा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर्क, सिद्धांत व संशयाने भरलेल्या या सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांनी कथानकाबाबतचे गुपित लपवून ठेवले आहे, तसेच ते उत्साही, हलक्या-फुलक्या प्रतिसादांसह प्रेक्षकांशी एकरूप होत आहेत, त्यांना आठवण करून देत आहेत की सिरीज प्रसारित झाल्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा होईल.
या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी पलक जैस्वाल म्हणाली, “आम्हाला सिरीज रीलीज होण्यापूर्वीच मिळत असलेले मेसेजेस पाहून मी भारावून गेले आहे. प्रेक्षक कथानकाचा उलगडा करण्याचा, रहस्याचा उलगडा करण्याचा आणि खऱ्या गुन्हेगाराबाबत अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सिरीज रीलीज होण्यापूर्वी त्यांनी दाखवलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे.”
रहस्याच्या अवतीभोवती असलेली प्रमुख भूमिका साकारणारा मयूर मोरे म्हणाला, “प्रत्येकवेळी कोणीतरी मला ‘तू किलर आहेस का!’ असे विचारल्यानंतर मी फक्त हसतो आणि म्हणतो की सिरीज पहा. ‘ब्लॅक व्हाइट अँड ग्रे’ची खासियत म्हणजे कोणीही पूर्णत: चांगला किंवा वाईट नाही आणि सत्य, नेहमीच खरे किंवा खोटे नसते.”
मुनव्वर फारुकीची Laughter Chefs 2 मध्ये होणार एन्ट्री? एल्विशशी जागा घेणार कॉमेडियन?
ही सिरीज जिद्दी पत्रकार डॅनियल गॅरीच्या अवतीभोवती फिरते, जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील तरुणाशी संबंधित असलेल्या खुनाचा उलगडा करण्याच्या मोहिमेवर आहे. डॅनियल तपासात खोलवर जाताना भ्रष्टाचार, पितृसत्ता आणि सामाजिक दुफळीचे जाळे उघड करतो, सत्य आणि न्यायाच्या गुंतागूंती उलगडत असताना अपराधीपणा व निर्दोषतेमधील तफावतींना निदर्शनास आणतो.
पुष्कर सुनिल महाबल दिग्दर्शित ‘ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे – लव्ह किल्स’चे निर्माते स्वरूप संपत आणि हेमल ए. ठक्कर आहेत. तिग्मांशू धुलियासह या सिरीजमध्ये नवीन व प्रतिभावान कलाकार आहेत, जसे मयूर मोरे, पलक जैस्वाल, देवेन भोजानी, एडवर्ड सोनेनब्लिक, हक्किम शाहजहान, अनंत जोग, कमलेश सावंत आणि इतर कलाकार पाहायला मिळणार आहे. ‘ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे – लव्ह किल्स’ची रोमांचक कथा येत्या 2 मेपासून फक्त सोनी लिव्हवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.