(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साजिद अली दिग्दर्शित आणि २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लैला मजनू’ या चित्रपटात अविनाश तिवारी कैस भट्ट आणि तृप्ती डिमरी लैलाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट काश्मीरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या लैला आणि मजनूच्या क्लासिक अरबी प्रेमकथेची पुनर्निर्मिती करतो. हा चित्रपट गेल्या वर्षी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि आज त्याने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. तसेच या चित्रपटाने पुन्हा सिनेमागृहात रि- रिलीज होऊन चांगली कमी केली आहे.
चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाचे २५ आठवडे पूर्ण
खरंतर, जेव्हा ‘लैला मजनू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या कथेसाठी आणि तृप्ती डिमरी आणि अविनाश तिवारी यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याचे कौतुक झाले. अखेर, लोकांच्या मागणीनुसार, हा चित्रपट ऑगस्ट २०२४ मध्ये पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आज या चित्रपटाला चित्रपटगृहात रि- रिलीज होऊन २५ आठवडे पूर्ण झाले आहेत. सध्या दिल्लीतील पीव्हीआर आयनॉक्स जसोला या एका थिएटरमध्ये दररोज सकाळच्या कार्यक्रमात चित्रपट दाखवला जातो, ज्यामुळे प्रेक्षकांची संख्या सातत्याने वाढते आहे.
चित्रपटासाठी मोठी कामगिरी
पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘लैला मजनू’साठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या काळात, अनेक चित्रपट कधी थिएटरमधून बाहेर पडतात आणि ओटीटीवर येतात हे कोणालाही माहिती नसते, परंतु अनेक मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान, ‘लैला मजनू’ ने हा टप्पा गाठला आहे. ‘लैला मजनू’ हा असा दुर्मिळ चित्रपट आहे ज्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांशी खोलवरचे नाते टिकवून ठेवले आहे.
चित्रपटाने मूळ रिलीजच्या वेळी फारशी जादू निर्माण केली नाही.
‘लैला मजनू’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट साजिद अली यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी सादर केला आहे. तर, एकता कपूर, शोभा कपूर आणि प्रीती अली यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मूळ प्रदर्शनावेळी या चित्रपटाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यामुळे हा चित्रपट जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही. तथापि, नंतर चित्रपटाला कलाकारांच्या अभिनयासाठी आणि गाण्यांसाठी खूप कौतुक मिळाले.