(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही एक बहुचर्चित वेब सिरीज आहे, जी आर्यन खान याने तयार केली आहे.यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या आयुष्याची आर्यनने पोलखोल केली आहे.या सिरीजमध्ये समीर वानखेडे यांचे नाव घेऊन त्यांची खिल्ली उडवली आहे.
या प्रसंगाची चांगलीच चर्चा रंगली होती,अखेर यावर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने निशाणा साधला आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात व्हिडिओत समीर वानखेडे ड्रग्जविरोधी मोहिमेविषयीच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत. यावेळी ते उपस्थित लोकांना ड्रग्ज किती हानीकारक आहे,याविषयी सांगत आहेत.
‘छावा’ सिनेमादरम्यान झालेल्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचा खुलासा, ”माझ्या भावना चुकीच्या पद्धतीने…”
या व्हिडीओखाली क्रांती म्हणाली, ”अमली पदार्थांचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याची खिल्ली उडवणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे हे खूप धोकादायक आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने या समस्येचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात होणारे मोठे दुष्परिणाम टाळता येतील.तर तिने समीर वानखेडे यांना टॅग करत म्हणाली आहे, तुम्ही समाजासाठी केलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ” अशा शब्दात क्रांतीने कॅप्शन लिहून समीर वानखेडेंच्या कामाचं कौतुक केले आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मोहनलालची प्रतिक्रिया; उघड केल्या भविष्यातील योजना
The Sameer Wankhede cameo in the Bads*** of Bollywood Is too good lol.
Iykyk#Badsofbollywood #AryanKhan #ShahRukhKhan𓀠 pic.twitter.com/05PTrvTEsy— PSG24 (@DOCPSG24) September 18, 2025
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजमध्ये समीर वानखेडे आणि त्यांनी आर्यन खानवर केलेल्या कारवाईची जी खिल्ली उडवली त्यावर क्रांतीने नाव न घेता निशाणा साधला आहे.अनेकांनी याबद्दल क्रांतीला सपोर्ट केला असून समीर वानखेडे ड्रग्जविरोधी जी कारवाई करत आहेत, त्याला सपोर्ट केला आहे.