फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस 18 मीडिया राउंड : बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले १९ जानेवारीला आहे, जिथे शोचा विजेता संपूर्ण देशाला मिळणार आहे. त्याआधी घरात एक पत्रकार परिषद काळ झाली होती, ज्यामध्ये अनेक स्पर्धकांचा गेम प्लॅन समोर आला आहे. यामध्ये स्पर्धकांना पत्रकारांनी खोचक प्रश्न आणि त्यांनी केलेल्या टीका टिपण्यांवर प्रश्न करून त्याला उत्तरे विचारली. घरामध्ये सध्या दोन जोडली सुरुवातीपासून चर्चित आहेत ती म्हणजेच करणवीर मेहरा आणि चुम दारंग यांचं तर दुसरं जोडपं अविनाश मिश्रा आणि इशा सिंह. यामध्ये करणवीर आणि चुम या दोघांची जोडी देशामध्ये त्याचबरोबर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.
शोच्या या शेवटच्या टप्प्यात स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. शोमध्ये स्पर्धकांमध्ये खूप शत्रुत्व आहे, तर काही मैत्री आणि नातेसंबंध देखील आहेत जे त्यांच्या जवळीकतेमुळे चर्चेत आले. एकीकडे ईशा आणि अविनाशच्या नात्याची बरीच चर्चा होत असतानाच दुसरीकडे करणवीर आणि चुमच्या मैत्रीनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता घरातील मीडियाने चुम आणि करणवीरच्या नात्यावर प्रश्न विचारला, ज्याला चुमने उत्तर दिले.
मीडियाने चुमला विचारले की तुमच्या आणि करणवीरच्या नात्याला काय म्हणतात ते मैत्रीपेक्षा जास्त आहे असे आम्हाला दिसले आहे. याशिवाय मीडियाने चुमला तिच्या प्लॅन्सबद्दलही विचारले, ती करणवीरसोबत लग्न करणार का? या प्रश्नावर प्रथम चुमला थोडी लाज वाटू लागली. यानंतर ती म्हणाली की मी बाहेर जाऊन याच उत्तर देणार आहे. यानंतर करणवीर म्हणतो की, सध्या भांडण सुरू आहे, ज्यावर चुम म्हणतो की हो, सध्या मी थोडी त्याच्यावर रागावलेली आहे.
एवढेच नाही तर मीडियाने चुमला सांगितले की, ती केवळ करणवीरमुळेच इथपर्यंत पोहोचली आहे. चुमवर आरोप होता की, जर करणवीर नसता, तर तिचा काही खेळ झाला नसता आणि तिला खूप आधी घरातून बाहेर काढले गेले असते. यावर चुमने सांगितले की, या घरामध्ये असलेले प्रत्येक स्पर्धकासोबत काही ना काही नाते होते, मग ते नाते मैत्रीचे असो वा शत्रुत्वाचे. या प्रवासात प्रत्येकाने आपापले योगदान दिले आहे.
Chummie BLUSHED OMG😭😭😭♥️♥️
SHIT MY DIL🤝🧿🧿😩#KaranveerMehra #ChumVeer #bb18 #biggboss18 pic.twitter.com/8k6LXgNyxN
— aliaa (@alia62055641) January 13, 2025
इतकेच नाही तर चुम आणि करणवीर यांना त्यांच्या बेडरूम आणि बाथरूमच्या सीनबद्दलही चौकशी करण्यात आली. करणवीर आणि चुम एकत्र बाथरुममध्ये गेले तेव्हा मीडियाने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उत्तरात चुमने सांगितले की, तिची करणवीरसोबत चांगली मैत्री आहे, ती बाहेर जाऊन बाकीचे बघेन.