फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : बिग बॉस १८ चा नवा टाइम गॉड : बिग बॉस १८ चे सदस्य घरामध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. सध्या सोशल मीडियावर या रिऍलिटी शोच्या संदर्भात प्रचंड चर्चा सुरु आहे. कालच्या भागामध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया झाली यामध्ये आता या आठवड्यामध्ये सहा सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, या आठवड्यामध्ये दोन सदस्यांना घराबाहेर काढले जावे अशी सोशल मीडियावर बिग बॉसच्या प्रेक्षकांचे म्हणणे आहे. या आठवड्यामध्ये इडन रोज, तीजेंदर बग्गा, दिग्विजय राठी, चाहत पांडे करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना हे स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आगामी भागामध्ये आता प्रेक्षकांना टाइम गॉडचा टास्क दाखवला जर आहे. यामध्ये चार सदस्य टाइम गॉड बनण्यासाठी दावेदार असणार आहेत.
Bigg Boss 18 : फराह खानच्या क्लासनंतर आता नात्यांमध्ये बदल! करणवीर-अविनाश यांच्यात होणार मैत्री?
यामध्ये प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सांगण्यात आले आहे की, जर घरातले तीन सदस्य सर्वात जास्त बिग बॉस करन्सी जिंकण्यात यशस्वी होतील ते तीन सदस्य टाइम गॉड बनण्याच्या शर्यतीमध्ये टिकून राहतील. या प्रोमोमध्ये सुरुवातीला अविनाश म्हणतो की, करणवीर मेहरा आणि दिग्विजय राठी यांना दावेदारीमधून सर्वात आधी बाहेर काढायचे आहे. तर दुसरीकडे करणवीर त्याच्या गटाला सांगतो तुम्ही तुमचं डोकं वापरून पुढे चला. त्यानंतर दोन्ही संघामधून सदस्य हे बिग बॉस करन्सी एकमेकांना देताना दिसले. त्यानंतर विवियन दिसेना म्हणतो की, जर तिने मला शेवटच्या क्षणाला बाहेर काढले तर?
करणवीर मेहराचा संघ सगळे पैसे त्याला देताना दिसत आहे. यावर दिग्विजय म्हणतो की, अल्मोस्ट टाइम गॉड त्याला म्हणजेच करणवीरला बोलले जात आहे. त्यामुळे आता मी माझे पैसे सगळे त्याला देणार आहे. आता या आठवड्यामध्ये टाइम गॉड बनण्याच्या शर्यतीमध्ये चार सदस्य आहेत. यामध्ये चुम दारंग, अविनाश मिश्रा, रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुन. आता आगामी दिवसांमध्ये घरामधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल हे पाहणं मनोरंजक ठरेल.
🚨 Time God Contendership 🚨 ☆ Avinash Mishra
☆ Rajat Dalal
☆ Chum Darang
☆ Shrutika Arjun Comments – Who will become the next Time God? — #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 9, 2024
‘बिग बॉस’ने दिलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये अविनाश मिश्राने त्याचे जवळचे मित्र विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांना नॉमिनेट केले. प्रोमोमध्ये जेव्हा हा सीन दाखवण्यात आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विवियनचे चाहते अविनाशबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. आता लाइव्ह फीडमध्ये अविनाशने विवियनला नॉमिनेट करण्यामागचे कारण समोर आले आहे.
बिग बॉसच्या चाहत्यांच्या मते, नॉमिनेशन टास्कनंतर विवियन, अविनाश आणि ईशा सिंग एकत्र बसून जेवण करत आहेत. अविनाश विवियनशी बोलतो आणि स्पष्टीकरण देतो. अविनाश म्हणतो, ‘तू माझा खरा भाऊ आहेस ते… करण विरुद्ध विवियन जर मी हे केले नाही तर माझ्याकडे फक्त तिसरे स्थान उरले आहे… करण विरुद्ध व्हिव्हियन तीन आठवड्यांपासून सुरू आहे आणि जर मी. नाही तर पूर्ण सिझन असाच चालू राहिला असता.’