(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सौंदर्या शर्मा झाली प्रचंड ट्रोल
सौंदर्या शर्माने हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्ये तिच्या ‘हाऊसफुल ५’ चित्रपटातील ‘लाल परी’ या गाण्यावर एक अप्रतिम परफॉर्मन्स दिला. या अभिनेत्रीने एका आकर्षक गोल्डन ड्रेसमधील आपल्या अनेक डान्स मूव्ह्सने चाहत्यांना थक्क केले. मात्र, अनेकांना तिच्या डान्स मूव्ह्स आवडल्या नाहीत आणि तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. सौंदर्याच्या डान्स व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली असून, ट्रोलर्सनी व्हिडिओवर अश्लील कमेंट्स केल्या आहेत.
एका युझरने व्हिडिओवर ‘निरर्थक’ अशी कमेंट केली. दुसऱ्या एका युझरने ‘किती लाजिरवाणी गोष्ट आहे’ असेही लिहिले. आणखी एका युझरने ‘ती खूप छपरी दिसत आहे’ असेही लिहिले. दुसऱ्या एका युझरने ‘ती बार डान्सरसारखी का नाचत आहे?’ असे लिहिले. एका ट्रोलने तर सौंदर्याला ‘नाचणारी’ असे लेबल लावले. आणि अभिनेत्रीला सगळे सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.
चाहत्यांनी सौंदर्याला दिला पाठिंबा
परंतु, या प्रसंगी चाहते सौंदर्याच्या पाठीशी उभे राहिलेले दिसले. अनेकांनी तिच्या लूकची आणि नृत्यशैलीची प्रशंसा केली. एका युझरने लिहिले, “तिने कमाल केली.” दुसऱ्याने लिहिले, “दोन्ही अप्रतिम आहेत.” चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजीसुद्धा पाठवले आहेत. तसेच तिच्या डान्सचे कौतुक करत आहेत.
हनी सिंग कॉन्सर्टमध्ये व्यस्त
आजकाल हनी सिंग एकापाठोपाठ एक कॉन्सर्ट करताना दिसत असून, त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकतेच, हनी सिंगने दिल्लीत परफॉर्म केले, जिथे चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. या शोमध्ये लॉरेन गॉटलिब हनीसोबत स्टेजवर दिसली. त्या दोघांनी आपल्या केमिस्ट्रीने स्टेजवर आग लावली.






