(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
ॲमेझॉनच्या मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेसाठी – ॲमेझॉन एम एक्स प्लेअरची आगामी क्राईम ड्रामा सिरीज ‘चिडिया उड’चा ट्रेलर लाँच झाला आहे. स्ट्रीमिंग सर्व्हिसने आज त्यांच्या अधिकृत ट्रेलर अनावरण केला, ज्यात “शो” च्या तीव्र जगाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आबिद सुरती यांच्या ‘केज’ या कादंबरीवर आधारित ‘चिडिया उड’ हा चित्रपट आहे. शक्ती, गुन्हेगारी आणि जगण्याची कथा या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हरमन बावेजा, विकी बाहरी निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित ‘चिडिया उड’ मध्ये जॅकी श्रॉफ, भूमिका मीना, सिकंदर खेर, मधुर मित्तल, मयूर मोरे आणि मीता वशिष्ठ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
ही कथा गुन्हेगारांच्या गोळीबारात अडकलेल्या आणि युती बदलणाऱ्या तरुणीची आहे. राजस्थानमधील सेहेर या तरुणीला मुंबईच्या कठोर जगाचा सामना करावा लागतो. ‘चिडिया उड’ हा चित्रपट तिला बांधलेल्या साखळदंडापासून मुक्त होण्यासाठी तिच्या लढ्याचा शोध कसा घेतला आणि जीवनातील कठोर वास्तव प्रकट करणार आहे. हा चित्रपट ॲमेझॉनवर मोफत स्ट्रीम करण्यात येणार आहे. ज्याचा आनंद प्रेक्षकांना घर बसल्या घेतला येणार आहे. या चित्रपटाची कथा आणि संपूर्ण स्टारकास्टचे काम पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
काय आहे ‘चिडिया उड’ची कथा?
‘चिडिया उड’ची निर्मिती हरमन बावेजा आणि विकी बहरी यांनी केली आहे. कथेच्या केंद्रस्थानी सहार (भूमिका मीना) नावाची मुलगी आहे. ती राजस्थानातील एका गावातून स्वप्नांच्या विमानाने मुंबईत आली आहे. पण ती गुन्हेगारी आणि वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकते. वेश्यालयाच्या साखळदंडातून स्वतःला मुक्त करण्यासाठी ती लढते. पण त्याच्या मार्गात उभा आहे कादिर खान (जॅकी श्रॉफ), जो या कुप्रसिद्ध जगावर राज्य करतो.
‘सर्व्हायव्हल हाच येथे अंतिम खेळ आहे’
या मालिकेत कादिर खानची भूमिका साकारणारा जॅकी श्रॉफ म्हणतो, ‘चिडिया उडची दुनिया चढ-उतारांनी भरलेली आहे. ही एक अशा ठिकाणाची कथा आहे जिथे जगणे हा अंतिम खेळ आहे आणि प्रत्येक पात्र स्वतःची लढाई लढत आहे. सहारची भूमिका साकारणारी भूमिका मीना म्हणते, ‘माझ्यासाठी हा विश्वासाच्या पलीकडचा प्रवास होता. सहार हा एक योद्धा आहे जो प्रतिकूलतेसमोर नतमस्तक होण्यास नकार देतो. जगण्याच्या लढ्याची ही कहाणी आहे.
शेवटी तो बापच… आमिर खानने लेक जुनैदचा ‘लव्हयापा’ चित्रपट सुपरहिट होण्यासाठी केला नवस
बावेजा स्टुडिओजमधून येणारा ‘चिडिया उड’ १५ जानेवारीपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर विनामूल्य प्रसारित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षक मोबाइलवर, ॲमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि कनेक्टेड टीव्हीवर ॲमेझॉन पीएक्स प्लेअरवर प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे.