( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये माहिका हार्दिक पांड्या, माहिका शर्मा आणि तिची आई दिसत आहे. या फोटोमध्ये माहिकाच्या भांगेत कुंकू आणि कपाळावर टिकली दिसत आहे. त्यामुळे सध्या यादोघांनी लग्न केले आहे. त्यामुळे या व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण आले आहे.
हा फोटो समोर आल्यानंतर, अनेक युझर्सनी असा अंदाज लावला की हा फोटो एखाद्या खाजगी लग्नसमारंभातील किंवा समारंभातील असू शकतो. पण हार्दिक किंवा माहिका यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने शेअर केले जात आहेत. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांनी आता आपले नाते पुढच्या टप्प्यावर नेले आहे. हार्दिक आणि माहिका यांनी आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून विभक्त झाल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी, हार्दिक पांड्याने मॉडेल माहिका शर्माला आपली नवीन जोडीदार म्हणून जगासमोर आणले. १० ऑक्टोबर रोजी, हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो माहिकासोबत समुद्रकिनाऱ्यावर दिसत होता. दोघेही निवांत आणि आनंदी दिसत होते, एकत्र चांगला वेळ घालवत होते. हार्दिकने स्टोरीमध्ये माहिकाच्या इंस्टाग्राम हँडलला टॅग केले होते, ज्याचा अर्थ चाहत्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा असा लावला. फोटोमधील दोघांमधील केमिस्ट्रीमुळे सोशल मीडियावर लगेचच चर्चा सुरू झाली.
हार्दिकपेक्षा सात वर्षांनी लहान असलेली महिका शर्मा भारतीय फॅशन इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. ती ELLE आणि Grazia सारख्या नामांकित मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहे. तिने इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘मॉडेल ऑफ द इयर’ हा किताबही पटकावला आहे. महिका तनिष्क, व्हिवो आणि युनिकलो यांसारख्या प्रीमियम ब्रँड्सच्या अनेक जाहिरात मोहिमांमध्ये दिसली आहे. ती अनेकदा तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा आणि अनिता डोंगरे यांसारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनी डिझाइन केलेले कपडे परिधान केलेली दिसते.






