फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ च्या घरात वादाची ठिणगी : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सध्या प्रचंड चर्चेत आहे. झालेल्या शुक्रवार आणि शनिवारच्या वॉरमध्ये सलमान खान नसल्यामुळे शुक्रवारच्या वॉरमध्ये निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर आली होती. तर शनिवारच्या वॉरमध्ये होस्ट आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी आला होता. या दोघांनी बऱ्याचदा सदस्यांना आरसा दाखवला. त्याचबरोबर काहीना अनेक सल्ले देखील दिले आहेत. मागील आठवड्यामध्ये अनेक राडे बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त क्लास सारा अरफीन खानची लागली. तिने अविनाश मिश्रा त्याचबरोबर इशा सिंह यांच्यावर अनेक टिपण्या केल्या होत्या त्यामुळे तिला न करण्याचा सल्ला रोहित शेट्टी यांनी दिला आहे.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : पक्षपात! प्रेक्षक संतापले, अजून किती करणार विवियन डिसेनाला जिंकवण्याचा प्रयत्न?
आता सोशल मीडियावर एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आता दिग्विजय राठी आणि विवियन डिसेना एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. या दोघांचा वाद हा बाथरूम साफ नसल्यामुळे झाला आहे. सुरुवातीला प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, बाथरूममध्ये जातो परंतु ते बाथरूम साफ नसते. यावर दिग्विजय राठी विवियन डिसेना टाइम गॉड असल्यामुळे त्याला प्रश्न करतो की, मला बाथरूम साफ करून देणार आहेत की मी स्वतः साफ करू नाही अंघोळ करू? यावर विवियन डिसेना म्हणतो की, बाथरूम साफ झाल्यावर मी तुला सांगेल. यावर दिग्विजय प्रश्न करतो विवियनला किती वेळ लागणार आहे? यावर उद्धटपणे विवियन जाता जाता म्हणतो की, माझ्याकडे घड्याळ नाही आहे टाइम मी नाही सांगू शकत.
It’s finally #DigvijayRathee vs #VivianDsena 🔥🔥
Who are you guys supporting in this fight ??
Rt – #VivianDsena
Like – #DiggyGang #BiggBoss18 #BB18 #VDianspic.twitter.com/C29IpDgTWk— Gori Nagori (@RealGoriNagori) November 9, 2024
त्यानंतर काही वेळामध्ये दिग्विजय येतो आणि म्हणतो सगळ्यांसमोर जेव्हा काम झाले पाहिजे तेव्हा काम करायला पाहिजे बरोबर. यावर विवियन म्हणतो की, बाथरूम साफ झाले होते. यावर दिग्विजय म्हणतो की, ही अत्यंत खोटी गोष्ट आहे. त्यानंतर मधेच अविनाश येतो आणि दिग्विजयला म्हणतो की, माहिती आहे तू कालपासून वाद घालण्याचा प्रयत्न करत आहेस. यावर दिग्विजय म्हणतो की, तू काम कर जे घरामधील काम आहे. कामचोरी उगाच करू नको. बसून काही होणार नाही आहे. यावर अविनाश म्हणतो तुझा यांच्यामध्ये काही संबंध नाही होता. यावर दिग्विजय म्हणतो की, कसा काय माझा संबंध नाही आहे मला अंघोळ करायची होती तू काम कर घरातली.
त्याचबरोबर कालच्या भागानंतर आणखी प्रोमो सोशल मीडियावर आला आहे. यामध्ये सारा अरफिन खान अविनाश मिश्रा, विवियन डिसेना आणि इशा सिंह यांचे पाय पकडताना आणि माफी मागताना दिसत आहेत.