फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : मागील नऊ आठवड्यापासून बिग बॉसच्या घरामध्ये अनेक राडे पाहायला मिळत आहेत. बिग बॉस घरांमधील सदस्यांसाठी अनेक सरप्राईझ देत असतात. त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले जात आहे. आगामी भागामध्ये वाक्यंयुद्धावरून आता सदस्यांचा वाद हा हाणामारीपर्यत पोहोचला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. आता या आठवड्यामध्ये झालेल्या वादांच्या संदर्भात सलमान खान विकेंडच्या वॉरला घरांमधील सदस्यांना आरसा दाखवणार आणि त्यांची क्लास घेणार असे प्रेक्षकांना वाटत होते.
आता ‘बिग बॉस 18’ च्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान या आठवड्यात वीकेंड का वार होस्ट करणार नाही. वास्तविक, सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ आणि 7 डिसेंबर रोजी दुबईत होणाऱ्या ‘दबंग रीलोडेड’ या आंतरराष्ट्रीय शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत तो शनिवार आणि रविवारी प्रसारित होणाऱ्या ‘बिग बॉस 18’ च्या एपिसोडचे शूटिंग करू शकणार नाही.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सलमानच्या अनुपस्थितीत चित्रपट दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान वीकेंड का वार होस्ट करणार आहे. फराह कुटुंबातील सदस्यांसाठी क्लास घेणार आहे. अविनाश मिश्रा, रजत दलाल आणि दिग्विजय राठी यांच्यातील लढतीबद्दल ती या आठवड्यात बोलणार आहे. खास पाहुणे म्हणून गायिका सुनिधी चौहान दिसणार आहे. तिच्या ‘आंख’ या गाण्याच्या प्रमोशनसाठी ती शोमध्ये येणार आहे. नेटफ्लिक्सच्या ‘द फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या वेब सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आलेली शालिनी पासी घराघरात जाणार आहे.
🚨 UPDATE: No shoot taken place today. #WeekendKaVaar shoot is now scheduled for tomorrow. Farah Khan will host the show this weekend for the same. Salman Bhai was supposed to host today, however, bhai was seen attending the Maharashtra CM oath ceremony.
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 5, 2024
आगामी विकेंडच्या वॉरमध्ये कशाप्रकारे फराह खान बिग बॉसच्या घरामधील सदस्यांची शाळा घेणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. सोशल मीडियावर सध्या या शोची प्रचंड चर्चा सुरु आहे. सदस्य फायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीमध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, रजत दलाल हे स्पर्धक टिकून आहेत. आता या आठवड्यामध्ये सहा सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामधील आता कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि त्याची टीम शुक्रवारी दुबईला रवाना होणार आहे. सलमानसोबत, तमन्ना भाटिया, जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, आस्था गिल, सुनील ग्रोव्हर, प्रभू देवा आणि मनीष पॉल यांसारखे इतर स्टार्स देखील दबंग रीलोडेड टूरचा भाग असतील.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. खून प्रकरणातील आरोपींनी हा खुलासा केला आहे. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, सलमान खानचे नाव गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्येही होते. मात्र, सलमानच्या कडेकोट सुरक्षेमुळे शूटर्स त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.