(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून झाल्यानंतर आता करण जोहर डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी नवीन चित्रपट बनवत आहे. या चित्रपटामध्ये नवी जोड झळकणार आहे. त्याचे प्रोडक्शन हाऊस धर्मिक एंटरटेनमेंट आता एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये आर माधवन आणि फातिमा सना शेख यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट एका वृद्ध पुरुष आणि तरुणीभोवती फिरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एक विचित्र प्रेमकथा असणार आहे, जी एका वृद्ध पुरुष आणि तरुण महिलेभोवती फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी मीनाक्षी सुंदरेश्वर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते
ब्रोकन बट ब्यूटीफुल आणि द फेम गेम वेब सीरिजच्या लेखिका राधिका आनंद आणि शोटाइम शोची लेखिका जहाँ हांडा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या दोघांनीही माधवनला दीर्घकाळानंतर त्याच्या लेखणीतून रोमँटिक इमेजमध्ये परतण्याची संधी दिली आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा- Friday Releases: या चित्रपटांच्या रिलीजने दसराला होणार धमाका, बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला!
करणचा या वर्षातील हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे
या चित्रपटाबाबत करण नेटफ्लिक्सशी चर्चा करत आहे. त्याच्यासोबत गोष्टी जुळून आल्यास, करणचा या वर्षातील हा तिसरा प्रोजेक्ट असेल, जो नेटफ्लिक्ससाठी बनवला जाईल. यापूर्वी, नेटफ्लिक्सने कोंकणा सेन शर्मा आणि प्रतिभा रंता यांच्या चित्रपटासाठी आणि एअरलाइन थीमवर बनत असलेल्या करणच्या शोला यापूर्वीच ग्रीन सिग्नल दिला आहे.