अनेक मुलाखतींमध्ये बॉलीवूड कलाकारांमधील आपण मैत्रीचे किस्से आणि गोष्टी पहिल्या आहेत. तसेच बोलववूड चित्रपटामध्येही अनेक मैत्रीवर आधारित चित्रपट होऊन गेले आहेत. ज्याची कथा आणि गाणी लोकांच्या मनाला भिडली आहेत. आज आपण अश्याच कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे खऱ्या आयुष्यात त्यांची मैत्री वर्षनुवर्षे जपत आले आहेत. आणि त्यांच्यामधील हे नाते शुद्ध आणि प्रेमाने भरलेले आहे. मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे ज्याची निवड आपण नेहमीच करतो. चला तर मग जाणून घेऊयात बॉलीवूडमधील अश्या कलाकारांना ज्याच्या मैत्रीची सर्वत्र चर्चा आहे.
'हे' प्रसिद्ध बॉलीवूड स्टार आहेत 'जिवाभावाचे मित्र', जे जगासमोर उभं करतात मैत्रीचे उत्तम उदाहरण (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अजय देवगण आणि रोहित शेट्टी 'फूल और कांटे' (१९९१) या चित्रपटापासून एकत्र आहेत. त्यांची मैत्री खूप प्रसिद्ध आहे आणि अजयने रोहित दिग्दर्शित अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजीव कपूरची मुलगी शनाया कपूर या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. सुहाना, अनन्या आणि शनाया लहानपणापासूनच एकत्र आहेत आणि त्यांच्यातील हे मैत्रीचे नाते घट्ट आहे.
शाहरुख खान आणि फराह खान यांची मैत्री 'कभी हान कभी ना' या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यांची मैत्री १९९४ पासून आजपर्यंत कायम आहे आणि दोघेही एकमेकांना व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या पाठिंबा देताना दिसत असतात.
संजय दत्त आणि सलमान खान यांची मैत्री खूप जुनी आहे. सलमान नेहमीच संजय दत्तला आपला मोठा भाऊ मानत आला आहे आणि आजही जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांचे नाते घट्ट असल्याचे दिसून येते. दोघांनीही 'साजन' आणि 'चल मेरे भाई' सारखे चित्रपट एकत्र केले आहेत.
आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी २०१२ मध्ये आलेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून एकत्र पदार्पण केले. त्यानंतर दोघांनीही 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सारखे चित्रपट एकत्र केले आणि ते खास मित्र बनले.
रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी हे बालपणीचे खास मित्र आहेत आणि अजूनही हे दोघे एकत्र आहेत. रणबीरने अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनात अनेक चित्रपट केले आहेत आणि आता आलिया भट्ट देखील अयानची चांगली मैत्रीण झाली आहे.
करण जोहर आणि काजोलची मैत्री खूप जुनी आहे. दोघेही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटामुळे त्यांची चांगली मैत्री झाली आणि नंतर काजोलने करण जोहर दिग्दर्शित अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सलमान खान आणि शाहरुख खान ही बॉलीवूडमधील दोन मोठी नावे आहेत. त्यांची मैत्री ९० च्या दशकापासूनची आहे पण ते सुमारे ५ वर्षे एकमेकांशी बोलले नाहीत पण २०१३ मध्ये ते पुन्हा एकत्र आले आणि अजूनही एकत्र काम करत आहेत. त्यांच्या मैत्रीमुळे ते एकमेकांच्या चित्रपटांमध्ये मोफत कॅमिओ देखील करतात.
दिशा पटानी आणि मौनी रॉय अलिकडेच मैत्रीण झाल्या आहेत. आता त्या अनेकदा एकत्र बाहेर जातात आणि फोटोही शेअर करताना दिसत असतात. तसेच, या दोघी चाहत्यांना खूप आवडतात.
रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर हे बालपणीचे मित्र आहेत आणि चुलत भाऊही आहेत. त्यांनी 'गुंडे' चित्रपटातही एकत्र काम केले आहे. त्यांची मैत्री अनेकदा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात दिसून येते.