बॉलिवूडमध्ये दोन अभिनेत्रींमधील सतत भांडण झाल्याची कथा तुमच्या कानावर पडली असेल, बऱ्याच काळापासून ग्लॅमर इंडस्ट्रीत एक समज आहे की दोन अभिनेत्री कधीच एकत्र येऊन मैत्रिणी बनू शकत नाहीत. परंतु असे काहीही नसून बरेचवेळा शाहरुख-सलमान ते अर्जुन कपूर-रणवीर सिंग यांसारख्या अभिनेत्यांच्या मैत्रीची उदाहरणे दिली जातात, पण जेव्हा अभिनेत्रींच्या मैत्रीचा प्रश्न येतो तेव्हा यूजर्स त्यांना सोशल मीडियावर वेगवेगळ्या टॅगने संबोधतात. मात्र, अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कधीही लोकांची पर्वा केली नाही आणि फक्त त्यांच्या मैत्रीला महत्त्व दिले आहे.
या अभिनेत्री फक्त एकमेकांच्या सोबत नाहीत तर सुख-दुःखात सोबत उभे राहणारे आणि मैत्री या शब्दाला खरे करणारे आहेत. तसेच आता फ्रेंडशिप डे जवळ येत असल्यामुळे आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्या एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड आहेत. तथापि, लोक जेव्हा त्यांना पाहतात तेव्हा ते म्हणतात की यांची मैत्री किती निखळ आहे आपली सुद्धा अशीच असायला पाहिजे असं त्यांना वाटू लागते.
करीना कपूर-अमृता अरोरा यांची मैत्री
करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांची मैत्री खूप जुनी आहे. तसेच हा चार मैत्रिणींचा ग्रुप आहे, ज्यात मलायका अरोरा-करिश्मा कपूर, करीना आणि अमृता यांचा समावेश आहे, परंतु दोघीही एकमेकांच्या खूप जवळ आहेत आणि यांच्या मैत्रीमाधील हीच खास गोष्ट आहे. कमबख्त इश्कच्या सेटवर निर्माण झालेली ही मैत्री काळानुसार अधिक घट्ट होत गेली. पार्ट्या असो की व्हेकेशन, दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. आणि सोशल मीडियावर या दोघांच्या फ्रेंडशिपची चर्चासुद्धा सुरु आहे.
दिशा पटानी-मौनी रॉय यांची मैत्री
दिशा पटानी आणि मौनी रॉय यांची मैत्री अभिनेता अक्षय कुमार यांच्यामुळे निर्माण झाली. दोघीही अक्षय कुमाच्या एंटरटेनर्स टूर या शो चा भाग होत्या तिथूनच त्यांची मैत्री घट्ट झाली आहे. आणि आता वाढदिवस असो वा अन्य प्रसंग हे दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात आणि सतत एकमेकांना भेटत असतात. या दोघांनाही त्यांच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते, पण त्यांना त्याची पर्वा नाही. या सगळ्यावरूनच त्यांची मैत्री किती निखळ आहे हे समजते.
सुहाना खान-अनन्या पांडे आणि शनाया कपूर
सुहाना-अनन्या आणि शनाया या त्रिकूटाचाही या यादीत समावेश आहे. या तिघी लहानपणापासून एकमेकांच्या मैत्रिणी आहेत, त्यांची मैत्री शालेय शिक्षणापासून आजपर्यंत कायम आहे. आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या टीमला सपोर्ट करणे असो किंवा एकत्र व्हेकेशन साजरे करणे असो, या तिघांना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ते नक्कीच एकत्र वेळ घालवतात. आणि या तिघींची मैत्री सोशल मीडियावर प्रसिद्धदेखील आहे.
जान्हवी कपूर-सारा अली खान
जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात जवळपास एकत्र केली होती. या दोघांनी 2018 मध्ये इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. आज सारा आणि जान्हवी दोघांकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. चाहत्यांनी दोघांची तुलना केली तरी त्यांच्यात स्पर्धा नाही कारण त्यांची मैत्रीचं इतकी घट्ट आहे की दोघींमध्ये काही स्पर्धा होऊच शकत नाही. खऱ्या आयुष्यात दोघेही एकमेकींच्या खूप जवळ आहेत. करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्येही या दोघी एकत्र दिसल्या होत्या. तसेच सारा आणि जान्हवी एकमेकींसोबत एकत्र प्रवास करताना दिसतात.
सोनम कपूर-स्वरा भास्कर
अभिनेत्री सोनम कपूरचा स्वभाव खूप सरळ आणि साधा आहे, तिच्या मनात जे आहे ते व्यक्त करण्यात ती अजिबात मागेपुढे पाहत नाही. तर असाच स्वभाव स्वरा भास्करचा देखील आहे त्यामुळे त्यांच्यातील मैत्री घट्ट आहे, या दोघींही लोकांच्या शब्दावर लवकर विश्वास ठेवत नाहीत. स्वरा भास्कर आणि सोनम कपूर कदाचित जास्त एकत्र फिरताना दिसणार नाहीत, पण दोघीही एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहेत. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांना पूर्णपणे सपोर्ट करतात. प्रेम रतन धन पायोच्या सेटवर दोघांची मैत्री झाली. आणि ती मैत्री अजूनही तशीच पाहायला मिळत आहे.