(फोटो सौजन्य - X अकाउंट)
महाभारत टीव्ही मालिकेतील अर्जुनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता शाहीर शेख, ‘दो पत्ती’ या चित्रपटातील ध्रुव सूदच्या भूमिकेसाठी चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसला. या भूमिकेत त्याला पाहून चाहते त्याचे खूप कौतुक होत आहे, अभिनेत्याने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केले आहे आणि अभिनेत्याने त्याच्या विविध भूमिकांची झलक चाहत्यांना दाखवली आहे. आपल्या अभिनय कौशल्यावर अभिनेता शाहीर शेख चाहत्यांना भुरळ घालत आहे. या चित्रपटामध्ये अत्यंत आघाडीची कामगिरी त्याने केली आहे.
हे देखील वाचा- Singham Again Vs BB 3: रूह बाबा समोर सिंघम अगेन पडला भारी, बॉक्स ऑफिसवर जबरदस्त केली कमाई!
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, शाहीरला विचारण्यात आले की त्याने ही व्यक्तिरेखा साकारण्याचा निर्णय का घेतला, जो त्याच्या नेहमीच्या “चॉकलेट बॉय” पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याबद्दल त्याने आपले विचार मांडले आणि अभिनेता म्हणाली की, “चित्रपटात पात्राचा गौरव केला असता आणि शेवटी त्याला शिक्षा झाली नसती तर ही माझ्यासाठी अडचण ठरली असती, पण संदेश योग्य आहे. शेवटी त्याला शिक्षा होते, आणि ते आवश्यक आहे.” असे त्याने या भूमिकेबाबत सांगितले. तसेच अभिनेता पुढे म्हणाला, “या भूमिकेमुळे मला विविध प्रकारच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. मला वाटले की ते माझ्यासाठी एक चांगले आव्हानात्मक पात्र ठरले आहे आणि मला स्वतःला आव्हान देणे आवडते म्हणून मी हे पात्र साकारले आहे.” असे अभिनेत्याने सांगितले. शेखने ध्रुव सूदची व्यक्तिरेखा स्वीकारली आणि उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
हे देखील वाचा- गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, सहा वर्षांपासून ‘या’ गंभीर आजाराने होत्या त्रस्त, जाणून घ्या लक्षणे
दो पत्तीमध्ये क्रिती सेनॉनने दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती जुळ्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. या चित्रपटात दोन बहिणी एकाच पुरुषावर प्रेम करत असल्याने खळबळ उडालेली पाहायला मिळणार आहे. ‘दो पत्ती’ चित्रपटामध्ये पहिल्यांदाच क्रिती निर्माती म्हणून पदार्पण करत आहे, तर शाहीर शेखचा हा बॉलिवूडमधील हा पहिला चित्रपट आहे. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रसिद्ध नाव, शाहीर मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवताना दिसला आहे. या चित्रपटात काजोल आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त शाहीर शेख आणि शशांक चतुर्वेदी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे हा चित्रपट फक्त प्रेक्षक नेटफ्लिक्सवरच पाहू शकता.