(फोटो सौजन्य- pinterest)
स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट अगदीच दोन दिवसांवर येऊन थांबला आहे. भारताने या दिवसाचा जल्लोषदेखील सुरु केला आहे. कुठे परेडचा सराव सुरू झाला आहे, तर कुठे देशभक्तीपर गीते गाण्याचा सराव सुरू आहे. तर या दिवशी काय सजावट करायची आहे हे देखील लोकांनी ठरवले आहे, तर या दिवशी कोणता कार्यक्रम आयोजित करायचा कोणते सदस्य या कार्यक्रमात सहभागी होणार हे देखील ठरवण्यात आले आहे. सगळीकडे स्वातंत्र्य दिनाची चर्चा सुरू आहे. संपूर्ण देशाला या दिवसाचे स्वागत चेहऱ्यावर हास्य आणि मोकळ्या मनाने करायचे आहे.
स्वातंत्र्यदिनी हा जल्लोष सगळीकडेच सुरू असतो. मात्र, या दिवशी काही गाणी वाजत असतात. या खास दिवशी अशी काही गाणी कानावर पडतात जी ऐकून आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान आणि प्रभाव पडतो. ही गाणी ऐकून सगळीकडे एकीचे वातावरण निर्माण होते. या मराठी आणि हिंदी गाण्यांशिवाय हा स्वातंत्र्यदिन अगदीच अधुरा वाटतो. चला तर मग टाकुयात या गाण्यावर नजर.
‘मेरे देश की धरती’ हे गाणं
‘मेरे देश की धरती’ हे प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांनी गायलेले लोकप्रिय गीत असून, हे गाणं ‘उपकार’ चित्रपटातील आहे. हे असे गाणे आहे, ज्याशिवाय हा दिवस पूर्ण होऊच शकत नाही. कारण, हे गाणं जवळपास प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमात वाजवले जाते. या गाण्यामध्ये अतिशय सुंदररित्या भारताचे वर्णन करण्यात आले आहे. हे गाणं ऐकून प्रत्येक भारतीय जागा होतो आणि त्याला भारतीय असल्याचा आभिमान वाटू लागतो.
‘जिंकू किंवा मरू’ हे गाणं
‘जिंकू किंवा मरू’ हे गाणं सगळेच लहानपणापासून ऐकत आले आहे. हे गाणे १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छोटा जवान’ या मराठी चित्रपटातील आहे. या गाण्यात स्त्री, पुरुष, आणि लहान मुले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढून, जोपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र मिळत नाही, तोपर्यंत पुनर्जन्म घेत हा लढा देत राहू, असा संदेश देताना दिसत आहे. हे गाणं शाळेतील कार्यक्रमातदेखील जास्त वाजताना दिसते, लहानमुलांना देखील हे गाणे खूप आवडते.
‘ये देश है वीर जवानों का’ हे गाणं
‘ये देश है वीर जवानों का’ हे गाणं ‘नया दौर’ चित्रपटातील प्रसिद्ध आणि लोकांच्या जवळ असलेले गाणे आहे. जे देशासाठी बलिदान दिलेल्या सगळ्या शहीद स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये आपल्या देशातील विविधतेची अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशंसा करण्यात आली आहे. तसेच लोकांना हे गाणं प्रचंड प्रमाणात आवडते. या गाण्याशिवायही स्वातंत्र्य दिन अधुरा वाटतो.
‘शूर आम्ही सरदार आम्हाला’ हे गाणं
‘शूर आम्ही सरदार आम्हाला’ या गीताची रचना शांता शेळके यांनी केली आहे. तर, हृदयनाथ मंगेशकर, हेमंत कुमार, लता मंगेशकर यांनी या गीताला आपला आवाज दिला आहे. हे गीत १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटातील आहे. हे गाणं मराठी असल्यामुळे अनेक भारतीयांचे आवडते गाणे आहे.
‘माँ तुझे सलाम’ हे गाणं
‘माँ तुझे सलाम’ हे गाणे ऑस्कर पुरस्कार विजेते एआर रहमानने गायले आहे. आजच्या काळात जेव्हाही देशभक्तीशी संबंधित कोणताही कार्यक्रम आयोजित केला जातो, तेव्हा एआर रहमानचे हे गाणे नक्कीच सर्वत्र गाजताना दिसते. या गाण्यानेही भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. या गाण्यावरही भारतीयांनी प्रेम केले आहे.
हे देखील वाचा- यंदाच्या स्वातंत्र्यदिनी उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या मदत
‘ऐ मेरे वतन के लोगों…’ हे गाणं
‘ऐ मेरे वतन के लोगों…’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गाणं खरोखरच वीरांच्या त्याग आणि शौर्याची आठवण करून देणारे अप्रतिम गीत आहे. या गाण्याला देशभक्तीपर प्रार्थना म्हटली, तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण या गाण्यात वेगळी ताकत आहे हे गाणं ऐकून भारतीय एक्कीच्या भावनेनी पेटून उठेन.