फोटो सौजन्य : सोशल मीडिया
लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपे इशिता दत्ता आणि वत्सल शेठ यांनी अखेर त्यांचा मुलगा वायु याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्याचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हील केला आहे. आणि त्यांनतर नेटकर्यांनीही चिमुकल्या वायूवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपे इशिता दत्ता आणि वत्सल शेठ यांनी त्यांचा पहिला वाढदिवस साजरा करताना त्यांचा लाडका मुलगा वायू याला जगासमोर आणले. या प्राउड पॅरेंट्सनी सोशल मीडियावर एक परिपूर्ण असा फॅमिली फोटो शेअर केला आहे. या जोडप्याच्या चाहत्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी लहानग्यावर प्रेमाचा वर्षाव केला. या चिमुकल्याचा चेहरा पहिल्यांदाच पाहून नेटकर्यांनीही त्यावर छान अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इशिता दत्ता आणि वत्सल शेठ यांनी बाळ वायूचा चेहरा केला रिव्हील
टेलिव्हिजन आणि बॉलीवूडमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इशिता दत्ताने 20 जुलै रोजी तिच्या Instagram अकाउंटवर हा फोटोअपलोड केला आहे. फोटोमध्ये, इशिता आणि वत्सल शेठ दोघेही फार आनंदित दिसत आहेत. आणि चिमुकला वायू झुल्यावर बसला आहे आणि त्या तिघांनीही अत्यंत गोड हास्य करत हा फोटो क्लीक केलेला पाहायला मिळत आहे. या कुटुंबातील शुद्ध आनंद आणि प्रेमाचे क्षण असलेला हा फोटो आहे. इशिता दत्ताने लिहिले की, ‘वायुचा वाढदिवस काल होता, परंतु कुटुंब काल वाढदिवस साजरा करण्यात खूप व्यस्त होते.’
फोटोसोबत, इशिताने कॅप्शन लिहिले, “Happy bday my baby… विश्वास बसत नाही की तू आता 1 वर्षाचा आहेस… तुला सर्व आनंद आणि प्रेम मिळो. मम्मा पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात वायू. त्याचा वाढदिवस 19 तारखेला होता पण आम्ही तो साजरा करण्यात फार व्यस्त होतो.”
या पोस्टने चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्वरीत लक्ष वेधून घेतले. ज्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लहान वायुसाठी प्रेम आणि आशीर्वादही दिले. शेवटी वायूचा चेहरा पाहून अनेक चाहत्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. तर काहींनी लहानग्या वायूला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. एकाने लिहिले, “शेवटी! त्याचा चेहरा पाहण्यासाठी मी एक वर्ष वाट पाहिली.” दुसऱ्याने लिहिले, “तो हुबेहूब त्याच्या वडिलांसारखे दिसतो ! मिनी टारझन.”
आणि या कुटुंबाशी अगदी जवळीक असलेला अभिनेता बॉबी देओलने रेड हार्ट इमोजी टाकले. आई होणार असणाऱ्या युविका चौधरीने लिहिले, “वाह पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा लिटिल बॉय!” अभिनेत्री हेली शाहनेदेखील कमेंट केली की, “Happpiesttt bdayyyy cutuuuu Vayuuuu!”