जस्मिन भसीन टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस सीझन 14 मध्ये एक उत्तम स्पर्धक म्हणून प्रेक्षकांना दिसली होती. नुकतीच तिची एक धक्कादायक बातमी चाहत्यांच्या समोर आली होती जी जाणून सर्वांना आश्चर्य वाटले. तिच्या डोळ्यात लेन्स घातल्यामुळे अभिनेत्रीला गंभीर समस्या झाली. आणि तिच्या डोळ्यांना त्रास होऊन तिला काहीच दिसत नव्हते. तिने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि सांगितले की तिला कॉर्निया डॅमेज नावाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांनी ती ४ किंवा ५ दिवसात बरे होईल असं देखील सांगितले होते. मात्र, आता तिची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून बुधवारी सकाळी ती मुंबई विमानतळावरही स्पॉट झाली आहे. यादरम्यान तिने पापाराझींशीही चर्चा केली आणि तिच्या तब्येतीची माहितीही दिली.
काळ्या चष्मात दिली पापाराझींसाठी पोझ
कॉर्नियाच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच जस्मिन भसीनला बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावर पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर हशा आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता. जस्मिन तिच्या कारमधून खाली उतरवून ती पापाराझींसाठी पोझ देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
अभिनेत्रीने सांगितली प्रकृतीची हालचाल
यावेळी पापाराझींनी तिला विचारले की ती आता कशी आहे आणि ती थांबली आणि हसली. ती पुढे पापाराझींना म्हणाली की फोटो क्लिक करताना फ्लॅश वापरू नये असे सांगितले. अभिनेत्रीच्या लुकबद्दल बोलायचे तर तिने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा कॉर्ड सेट, आणि चेहऱ्यावर गडद काळ्या रंगाच चष्मा घातला होता.
प्रियकर अलीने घेतली काळजी
अभिनेत्रीला डोळ्यांची समस्या आल्यानंतर तिचा प्रियकर अली गोनीने तिची पूर्ण काळजी घेतली. जस्मिननेही एक पोस्ट शेअर करताना अलीचे कौतुक केले होते. जस्मिन भसीन 17 जुलै रोजी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यादरम्यान तिला ही समस्या उद्भवून आली होती. ती या कार्यक्रमासाठी तयार होत होती आणि डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याबरोबर तिला चिडचिड होऊ लागली. असे असूनही तिने आपल्या कामातील वचनपूर्ती सुरूच ठेवली. मात्र, नंतर जेव्हा ती डॉक्टरांना भेटायला गेली तेव्हा तिचा कॉर्निया खराब झाल्याचे समोर आले, त्यामुळे तिला काही काळ दिसू शकले नाही. आणि या नंतर तिच्या संपूर्ण तब्येतीची जबाबदारी प्रियकर अलीने घेतली होती.