(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘महाराज’ या चित्रपटातून ओटीटीच्या दुनियेत पदार्पण करणारा जुनैद खान लवकरच एका प्रेमी मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. जुनैद खान वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांमध्ये भूमिका आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. तो त्याच्या आगामी ‘लवयापा’ या चित्रपटात खुशी कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आज म्हणजेच 3 जानेवारी रोजी या चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हे गाणं सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला
जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या लवयापा चित्रपटातील ‘लवयापा हो गया’ हे गाणे रिलीज झाले आहे. ज्यामध्ये हे दोन्ही कलाकार यापूर्वी कधीही एकत्र दिसले नव्हते. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाच्या एकाच ट्रॅकमध्ये दोघांनीही वेगवेगळे पोशाख परिधान केले आहेत. नकाश अजीज आणि मधुबंती बागची यांनी गायलेल्या या गाण्यात जुनैद आणि खुशी यांनी त्यांची वेगळी आणि मजेदार बाजू दाखवली आहे. आधुनिक रोमान्सच्या माध्यमातून दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असल्याचे गाण्यातून स्पष्ट दिसत आहे. तसेच या गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Game Changer Trailer: ‘गेम चेंजर’च्या ट्रेलरमध्ये राम चरणची लक्षवेधी भूमिका, कियाराने वाढवला ग्लॅमर!
टीझर आणि ट्रेलरपूर्वी गाणे रिलीज झाले आहे
या गाण्यात जुनैद खान गुच्ची आणि खुशी कपूर बानीच्या भूमिकेत आहे. अद्वैत चंदनच्या चित्रपटातील हे गाणे एक अनोखे आधुनिक ट्विस्ट घेऊन आले आहे. टीझर आणि ट्रेलरच्या आधीच लवयापाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंट निर्मित, लवयापा ही आधुनिक प्रणयरम्य कथा आहे. ही चाहत्यांच्या नक्कीच पसंतीस येणार आहे. या गाण्यानंतर आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या
या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. एका यूजरने लिहिले, ‘जुनैदने या चित्रपटातून आजच्या तरुणाईवर प्रयोग केल्याचे दिसते.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘जुनैद खान लव्हर बॉयच्या भूमिकेत खूप क्यूट दिसत आहे’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘जुनैद आणि खुशी कपूरची जोडी खूप छान दिसत आहे.’ असे लिहून चाहत्यांनी या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा अद्यापही स्पष्ट झालेले नाही.