Madhuri Dixit (फोटो सौजन्य-Instagram)
अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या ग्रँड वेडिंग रिसेप्शनमध्ये जगभरातील सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या सोहळ्यात उघोजकांपासून ते बॉलीवूड आणि साऊथ सिनेमांपर्यंतच्या स्टार्सचा मेळा पाहायला मिळाला आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात अनेक कलाकार थिरकताना दिसले आहेत ज्यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत.
अनंत-राधिकाच्या लग्नात माधुरीने भरले रंग
या दोघांच्या लग्नात सगळे कलाकार सहभागी होताना दिसले होते. बॉलीवूडमधल्या सगळ्या अभिनेत्री खूप सुंदर आणि सुरेख दिसत होत्या. याच दरम्यान या सोहळ्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित सुद्धा चमकली होती. तिच्या अदा, पोशाख आणि डान्स पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तसेच या सुंदर अभिनेत्रीने ‘चोली के पीचे’ या आयकॉनिक गाण्यावरही जोरदार डान्स देखील करताना दिसली आहे.
माधुरी ‘चोली के पीछे’ गाण्यावरील थिरकली
लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माधुरी दीक्षित तिच्या ‘चोली के पीचे क्या है’ या आयकॉनिक गाण्यावर एक्सप्रेशन देताना नाचताना दिसत आहे. माधुरी खूप गर्दीसुद्धा तिच्याच सुरात गोड हसत आणि थिरकताना दिसत आहे. अभिनेत्रींचे या गाण्यावरील हावभाव, तिची स्टाईल इंटरनेटवर व्हायरल झाली आहे आणि तिने लोकांना घायाळ केले आहे. माधुरीचा डान्स पाहून पुन्हा एकदा लोक तिची स्तुती करताना दिसत आहेत.
माधुरीच्या शेजारी उभे असलेले श्रीराम नेनेही नाचत आहेत. त्याचवेळी पत्नीला नाचताना पाहून ते देखील तिच्या कडून लक्ष हटवत नाही आहे. माधुरीच्या या डान्सने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. माधुरी दीक्षितचा डान्स पाहून नेटकाऱ्यानी तिच्या या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. एका नेटकाऱ्याने तिला कमेंट केली, ‘या वयातही तू इतकी ग्रेसफुली नाचतेस.’ एकाने लिहिले की, ‘बॉलिवुडची बेस्ट डान्सर.’ अश्याप्रकारे चाहत्यांचा प्रतिसाद तिच्या व्हिडिओला मिळाला आहे.