• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Neha Dhupia Has Been Struggling To Get Work In The Hindi Film Industry

‘मी 22 वर्षांपासून संघर्ष करत आहे’, नेहा धुपियाने हिंदी चित्रपटसृष्टीत काम न मिळण्याचा केला खुलासा!

नेहा धुपियाने अलीकडेच तिच्या चित्रपटसृष्टीतील संघर्षांबद्दल सांगितले आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिला शेवटच्या वेळी हिंदी चित्रपटाची ऑफर कधी आली हे आठवत नाही. नेहा धुपियाने असेही सांगितले की, ती गेली 22 वर्षे बॉलीवूडमध्ये चांगले काम मिळविण्यासाठी धडपडत आहे, परंतु तिच्यासाठी पुढे जाण्याचे मार्ग उघडत नाही आहेत. आता अभिनेत्री नेहा धुपियाने याबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 22, 2024 | 05:04 PM
Neha Dhupia (फोटो सौजन्य- Instagram)

Neha Dhupia (फोटो सौजन्य- Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने नुकताच तिच्या संघर्षाबद्दल खुलासा केला आहे. 22 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतरही नेहा चित्रपटसृष्टीत चाहत्यांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. ती चांगल्या चित्रपटाच्या आणि भूमिकेच्या शोधात आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिला शेवटच्या वेळी हिंदी चित्रपटाची ऑफर कधी आली हेही आठवत नाही आहे. आता याच बद्दल या अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

नेहा धुपियाने 2003 मध्ये “कयामत: सिटी अंडर थ्रेट” या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तरीही तिला योग्य ती ओळख चाहत्यांमध्ये मिळाली नाही असे तिने सांगितले आहे. तसेच अनेकदा आपल्या टॅलेंटनुसार काम मिळत नाही असे देखील ती म्हणाली आहे.

नेहा 22 वर्षांपासून करतेय संघर्ष
नेहा धुपियानेही खुलासा केला की, तिला बॉलीवूडमधून ऑफर्स मिळत नसल्या तरी तिला साऊथमधून काम करण्याची संधी मिळत आहे. बॉलीवूड हंगामासोबतच्या मुलाखतीदरम्यान, अभिनेत्री म्हणाली, “मी अशा ठिकाणाहून आले आहे जिथे मी सिनेमाच्या मनोरंजक भागाशी जोडण्यासाठी 22 वर्षांपासून संघर्ष करत आहे. काही वेळा माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात.” असे ती म्हणाली आहे.

काम करणे आवश्यक आहे
ती पुढे म्हणाली की, “कसे कोणीतरी येऊन म्हणतं, ‘अहो, ते छान होतं’ किंवा ‘यामधलं तुझं काम आम्हाला आवडलं’, ‘अरे, यामध्ये तू खूप छान काम केला आहेस, आपण एकत्र काम करू शकतो’ या सगळ्यामुळे तुमच्या कामात वेगळा बदल घडून येतो, काम चांगले असेल तर ते प्रेक्षकांना भरपूर आवडते, त्यामुळे स्वतःचे काम तपासून पाहणे जास्त गरजेचे असते.” असे तिने सांगितले.

नेहाला साऊथ चित्रपटातील मिळाल्या ऑफर्स
साऊथ चित्रपटांच्या ऑफर्सबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मला साऊथमधून चित्रपटाची ऑफर आली आहे, ही ऑफर मी कशी स्वीकारावी हे मला माहित नाही, कारण मला या इंडस्ट्रीबद्दल जास्त माहिती नाही, पण मला साऊथ चित्रपटांमध्ये काम करायचे आहे, हे करायला मला खूप आवडेल आणि गेल्या तीन महिन्यांत सलग दोन ऑफर मिळाल्या आहेत.” असे तिने या मुलाखतीत सांगतिले आहे. नेहाने साऊथ चित्रपटांमध्ये काम करायची उच्च व्यक्त केल्यामुळे ती आता खरंच या सिनेमाइंडस्ट्री मध्ये दिसणार का याची चाहत्यांना आशा आहे.

हे देखील वाचा- आमिर खानच्या घटस्फोटानंतर किरण राव आहे आनंदी, म्हणाली- ‘मला अजिबात एकटं वाटत नाही’!

सिनेमाइंडस्ट्रीचे चुकले गणित
हिंदी चित्रपटांच्या न मिळालेल्या ऑफर्समुळे निराशा व्यक्त करत नेहा म्हणाली, “माझ्याकडे शेवटच्या वेळी हिंदी चित्रपटाची ऑफर कधी आली हे मला आठवत देखील नाही. माझा फोन वारंवार का वाजत नाही, हे मलाही कळत नाही. या सिनेमाइंडस्ट्रीच्या टप्प्यातून जाणे खरोखर कठीण आहे, त्यामुळे मी दरवाजे ठोठावतो, जे मी नेहमी करते आणि मला वाटते की तेथे जाऊन काम मागणे काही चुकीचे नाही, आणि तुम्ही काही चुकीचे करत नाही आहात. कारण मला वाटते जे लोक काम देतात. त्यांनासुद्धा अनेकदा प्रत्येक गोष्टींचा संघर्ष करावा लागतो, या इंडस्ट्री मधील गणित जमले नाही की, त्यांनादेखील खूप मेहनत घ्यावीची लागते. कधी कधी तर स्क्रिप्टशिवाय त्यांना चित्रपट बनवावा लागतो. आणि ही स्क्रिप्ट पैशाची एक्सेल शीट असते आणि ते गणित जमवून आलेच नाही, तर मग तुम्ही कोणाकडे जाल? असे तिने या सिनेमासृष्टीतील नेमके काय गंमत आणि या इंडस्ट्रीमध्ये कोणती मेहनत घ्यावी लागते हे स्पष्ट सांगितले.

Web Title: Neha dhupia has been struggling to get work in the hindi film industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 05:04 PM

Topics:  

  • Neha Dhupia

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

Feb 24, 2026 | 01:00 PM
Avimukteshwaranand Case: अविमुक्तेश्वरानंदांवर लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी मला पैशांची ऑफर; ‘ रामाशंकर दीक्षित यांचा खुलासा

Avimukteshwaranand Case: अविमुक्तेश्वरानंदांवर लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी मला पैशांची ऑफर; ‘ रामाशंकर दीक्षित यांचा खुलासा

Feb 24, 2026 | 12:50 PM
BJP state executive announced : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी

BJP state executive announced : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी

Feb 24, 2026 | 12:48 PM
Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

Feb 24, 2026 | 12:46 PM
हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

Feb 24, 2026 | 12:45 PM
Alpha : YRF ने Netflix ची 215 कोटींची ऑफर नाकारली; आलिया-शर्वरीचा चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

Alpha : YRF ने Netflix ची 215 कोटींची ऑफर नाकारली; आलिया-शर्वरीचा चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

Feb 24, 2026 | 12:44 PM
Vijay- Rashmika करणार हटक्या पद्धतीत लग्न; पाहुण्यांसाठी खास जपानी खाद्यपदार्थांची मेजवानी, मोबाईलवरही केली बंदी

Vijay- Rashmika करणार हटक्या पद्धतीत लग्न; पाहुण्यांसाठी खास जपानी खाद्यपदार्थांची मेजवानी, मोबाईलवरही केली बंदी

Feb 24, 2026 | 12:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.