(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
फुले या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘फुले’ हा चित्रपट यावर्षी 11 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भारतीय सामाजिक सुधारणा चळवळीतील दोन प्रमुख व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि वारसा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाची आतुरता आता चाहत्यांना लागून राहिली आहे.
या दिवशी फुले हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या बहुप्रतिक्षित ‘फुले’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आणि यांच्या कार्यावर आधारित हा चित्रपट यावर्षी 11 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिलीजची तारीख ज्योतिरावांच्या 197 व्या जयंतीशी सुसंगत आहे. हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका आणि पत्रलेखा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. झी स्टुडिओजने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे अनाउंसमेंट पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, डान्सिंग शिवा फिल्म्स, किंग्समॅन प्रॉडक्शन्स निर्मित ‘फुले’ हा चित्रपट ११ एप्रिल रोजी थिएटरमध्ये आणत आहोत, 2025.” ज्योतिराव फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त ज्योतिराव फुले यांचे जगभरात प्रकाशन जाहीर करण्यासाठी एकत्र येत आहोत.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली.
“…ते तुझ्या संघर्षाचे फळ आहे”, अभिनेता किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसाठी खास पोस्ट
चित्रपटाची कथा
हा चित्रपट महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटामधून अनुभवता येणार आहे. ज्यांच्या भारतातील शैक्षणिक आणि सामाजिक समतेच्या क्षेत्रातील कार्याने चिरस्थायी वारसा सोडला आहे. पत्रलेखा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाल्या, “या चित्रपटात सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारताना मला खूप सन्मान वाटतो. ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतामध्ये आधुनिक शिक्षण आणि सामाजिक समतेचा पाया घातला आहे.’ असे त्यांनी सांगितले. आज २०२५ मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, फुले यांच्या प्रकाशनाची घोषणा करत आहोत, प्रेक्षक लवकरच त्यांचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर पाहू शकतील.