बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या 'सिटाडेल' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची तयारी सुरू केली आहे. रुसो ब्रदर्सच्या या सिरीजमध्ये प्रियांका 'नादिया'च्या भूमिकेत जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. दरम्यान, अभिनेत्री एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत पोहोचली, तिथून तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा तिच्या किलर लूकने चाहत्यांचे होश उडवत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा 'पाणी' हा मराठी चित्रपटदेखील नुकताच प्रदर्शित झाला आहे.
प्रियंका चोप्राचे पहा सोशल मीडियावर नुकतेच शेअर केलेले फोटो
शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियंकाने ऑफ व्हाईट रंगाचा लांबलचक गाऊन परिधान केला आहे. या गाऊनचे संपूर्ण नक्षी काम जोडीदार आहे. सोबतच हा डायमंनने भरीव असलेला गाऊन अभिनेत्रीवर खूपच सुंदर दिसत आहे.
प्रियंकाने परिधान केलेला हा गाऊन मागून बॅकलेस आहे. ज्याध्ये तिची बॅकसाईड खूपच आकर्षित दिसत आहे.
अभिनेत्रीने या गाऊनवर साधा परंतु आकर्षित मेकअपची निवड केली आहे. तिने जाड काजळ, मस्कारा, आयलायनर, हलका गुलाबी ब्लश आणि न्यूड लिपस्टिकचा वापर करून हा सुंदर लुक परिपूर्ण केला आहे.
या सगळ्यासह प्रियंकाने या गाऊनवर तिच्या सुंदर केसांचा बन बांधून एक बट मोकळी ठेवली आहे. तसेच अभिनेत्रीने कानात सिल्वर इरिंग आणि हातात सिल्वर कट्टा घातला आहे.
अभिनेत्रीने या गाऊनवर वेगवेगळ्या पोज देऊन आपल्या अदानी चाहत्यांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावर प्रियांकाचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.