(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Raghav Juyal Talks About Shahrukh Khan’s Mannat: शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची बहुचर्चित वेबसीरिज ‘द बैड्स ऑफ बॉलिवूड’ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार झळकले आहेत. या सीरिजमध्ये अभिनेता राघव जुयाल याने एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून, त्याने त्याच्या या अनुभवाबद्दल नुकतंच एक मजेशीर आणि खास किस्सा शेअर केला. राघव जुयालने शाहरुख खानच्या ‘मन्नत’बद्दल, तसेच आर्यन खानबद्दल सांगितलं आहे.
‘परवेज’ नावाच्या पात्रामध्ये राघव दिसून येतो, आणि शूटिंगदरम्यानच्या अनेक आठवणी त्यांनी शेअर केल्या. त्यामध्ये सर्वात खास क्षण ठरला, जेव्हा तो पहिल्यांदा शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात गेला होता.राघवने हसत हसत सांगितलं, “मन्नतमध्ये पोहोचल्यावर तिथे एअरपोर्टसारखं स्कॅनिंग केलं गेलं. मलाही त्यातून जावं लागलं. कारण- तिथल्या लोकांना वाटायचं की, हा कोण आहे.”
राघव पुढे म्हणाला, “मी चुकून आर्यनला विचारलं, ‘तुझी रूम कुठे आहे?’ आणि लगेच लक्षात आलं की हे शाहरुख खानचं घर आहे. इथे रूम नव्हे तर संपूर्ण फ्लोअर्स असतात!”त्यावर आर्यन फक्त हसला आणि म्हणाला चल जाऊयात. त्यानंतर आम्ही त्याच्या मित्रांबरोबर डिनरसाठी गेलो.”शाहरूख खानच्या मन्नतमध्ये गेल्यानंतर राघव इतका भारावला होती की त्याने बाहेर आल्यानंतर त्याच्या आईला फोन केला होता.राघवने सांगितलं की “आई, मी आत मन्नतमध्ये गेलो होतो!” तिली खूप आनंद झाला आणि ती विचारायला लागली की “घर खरंच तितकं सुंदर आहे का?”
‘सैयारा’ नंतर अहान आणि शर्वरीची जोडी करणार धमाका! यशराजच्या मोठ्या प्रोजेक्टवर करणार काम
Bigg Boss 19: मालती चहरने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेताच तान्या मित्तलचा पर्दाफाश, बोलती केली बंद
‘स्क्रीन’शी बोलताना राघवने सांगितलं की, त्याच्या घरातले सगळेच शाहरुख खानचे मोठे चाहते आहेत.तो म्हणाला, “माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. मी त्याचा प्रचंड चाहता आहे. आपण सगळेच त्याचे चाहते आहोत, पण मी खरंच खूप मोठा चाहता आहे. शाहरुखसोबत काम करणं हे त्याच्यासाठी केवळ एक प्रोजेक्ट नव्हे, तर एक स्वप्नपूर्ती आहे.मी त्याच्याबरोबर जेव्हा जेव्हा काम केलं आहे तेव्हा तेव्हा मला खूप आनंद झाला आहे आणि मला माहीत आहे की, यापुढेही अनेकदा आम्ही एकत्र काम करणार आहोत.”राघव जुयाल सिद्धार्थ आनंद यांच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटातूनही झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये शाहरुख खानसह त्याची लेक सुहाना खानही झळकणार आहेत.