'गेम चेंजर'च्या निर्मात्यांकडून ४५ जणांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय ?
चाहत्यांमध्ये ग्लोबल सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेला राम चरण त्याच्या आगामी ‘गेम चेंजर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. हा राजकीय ॲक्शन ड्रामा 2025 मधील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात काही काळापूर्वी चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. ‘गेम चेंजर’च्या प्री-सेल्समध्ये आतापर्यंत किती कमाई झाली आहे हे आपण जाणून घेऊयात.
एवढी कमाई उत्तर अमेरिकेत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये झाली
‘गेम चेंजर’ 10 जानेवारी रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाने उत्तर अमेरिकेत चार लाख २५ हजार डॉलर्सची ॲडव्हान्स बुकिंग केली आहे. सध्याच्या वेळेनुसार भारतात ती सुमारे 3 कोटी 64 लाख रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 3 जानेवारीपर्यंत या चित्रपटाच्या 1200 शोच्या 15,000 पेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येईल तसतसे त्याचे ॲडव्हान्स बुकिंग आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा चित्रपट पाहण्याची उत्सुक चाहत्यांमध्ये जास्तच आहे असे दिसून येत आहे.
हिट होण्यासाठी चित्रपटाला अनेक कोटींची ओपनिंग घ्यावी लागेल
हिट होण्यासाठी या बिग बजेट चित्रपटाला भारतात पहिल्याच दिवशी किमान 90 कोटींची ओपनिंग घ्यावी लागणार आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला तर बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. आणि हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला ब्लॉकब्लस्टर चित्रपट ठरेल. तसेच याआधी या चित्रपटाचे नुकताच ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
दिग्दर्शक शंकराच्या परीक्षेचा काळ
सध्या भारतात ‘गेम चेंजर’ची ॲडव्हान्स सुरू झालेली नाही. मात्र, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर प्रेक्षकांची नजर आहे. शंकरसाठी हा चित्रपट महत्त्वाचा आहे, कारण त्याचा मागील चित्रपट इंडियन 2 बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात कमल हसन मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने सिनेमागृहात जास्त कमाई केली नाही.
अभिनेते अभिताभ बच्चन यांचा देशाच्या ‘महानायक’ यांच्या निधनावर शोक; म्हणाले ‘स्वर्गातले आमचे नायक…’
‘डाकू महाराज’ चित्रपटाची टक्कर
‘गेम चेंजर’ हा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिलेला राजकीय ॲक्शन ड्रामा आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होत आहे. मात्र, या चित्रपटाला आंध्र प्रदेश आणि तेलंगणात बालकृष्ण यांच्या ‘डाकू महाराज’ या चित्रपटाशी स्पर्धा होणार आहे. आता ‘गेम चेंजर’ सिनेमागृहात किती कमाई करतोय हे पाहणे उत्कंठाचे होणार आहे.