फोटो सौजन्य - Social Media
गेम चेंजर हा चित्रपट बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील राम चरण आणि कियारा अडवाणीचा लूकही प्रेक्षकांना आवडला आहे. मात्र चित्रपटाच्या ट्रेलरबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. गेम चेंजर चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी गेम चेंजर चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती शेअर केली आहे की गेम चेंजर चित्रपटाचा ट्रेलर कधी आणि कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर पाहता येणार आहे.
पॅन इंडियाचा स्टार राम चरण गेम चेंजर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रामच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान दिल राजू हे म्हणाले की, “ट्रेलर तयार आहे, पण तुमच्यासमोर रिलीज करण्यापूर्वी अजून काही काम बाकी आहे. ट्रेलर चित्रपटाची रेंज ठरवतो. आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही तो अनुभव घ्या. हा ट्रेलर 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल.” असे त्यांनी सांगितले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल राजू म्हणाले की, “अमेरिकेत यशस्वी कार्यक्रम आयोजित केल्यानंतर, आम्हाला तेलुगू राज्यांमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करायचा होता, ज्यामध्ये आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण गरू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.” तसेच ते फुडें म्हणाले की, राम चरणच्या चित्रपटात ही घटना इतिहास घडवू शकते. तसेच, या चित्रपटाची प्रतीक्षा अनेक काळापासून चाहते करत आहेत. याचदरम्यान आता निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज डेट जाहीर केली असून, यामुळे चाहते देखील आनंदी झाले आहेत.
गेम चेंजर हा दिग्गज चित्रपट निर्माता एस शंकर दिग्दर्शित आगामी राजकीय ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपटाची कथा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली असून या चित्रपटात कियारा अडवाणीसह राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा राम चरण या IAS अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेवर केंद्रित आहे जो भ्रष्ट राजकीय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी लढतो. टीझरमध्ये, तो त्याच्या अनेक लूकमध्ये दिसत आहे, जे त्याच्या दुहेरी भूमिकेकडे निर्देश करते. गेम चेंजर हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
राम चरण आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त चित्रपटात एसजे सूर्या, अंजली, समुथिराकणी, श्रीकांत आणि जयराम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राम चरण RC16 नावाच्या आणखी एका चित्रपटात काम करत आहेत. याचे दिग्दर्शन बुची बाबू सना करत आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूर अभिनेत्यासह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर शिवा राजकुमार सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस आहे.