Samantha Ruth (फोटो सौजन्य - Instagram)
साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना व्हायरल इन्फेक्शनसाठी हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशन वापरण्याचा सल्ला दिला होता. यादरम्यान तिला डॉ. सिरिफ एबी यांनी फटकारले होते.
जीवनात बदल करा
अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने तिचा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट आणि तिच्या आजाराबद्दल बोलताना दिसली आहे. वास्तविक, समांथाला मायोटिस नावाचा आजार आहे. एले इंडियाला दिलेल्या मुलाखतीत समंथा म्हणाली की, तिला तिचे कोणतेही अनुभव बदलायचे नाहीत कारण या सगळ्यामुळे मजबूत बनली आहे. अभिनेत्रीने असेही उघड केले की तिच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्ष तिला खूप शांतता मिळाली आहे.
समंथा म्हणाली, “आपल्या सगळ्याची इच्छा असते की आपण सुद्धा आपल्या जीवनात थोडे बदल घडावे, परंतु कधी-कधी मला आश्यर्य वाटते की ‘मला या गोष्टीची गरज आहे..?’ पण मागे वळून पहिले तरी या शिवाय माझ्याकडे दुसरा कोणता मार्ग नव्हता”. असे समंथाने सांगितले.
प्रत्येक आव्हानाला सामोरे गेली
समंथा पुढे म्हणाली की, ‘मी या आधी या विषयावर माझ्या मित्रांसोबत चर्चा केली होती, मी नेहमी हा विचार करते की गेले तीन वर्ष जे काही घडले ते घडायला पाहिजे नव्हते, परंतु मला आता असे वाटते की जीवनात आलेला प्रत्येक प्रसंगाला आपल्याला सामोरे जावे लागते, आणि जेव्हा तुम्ही या प्रसंगातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही जीवनात यशस्वी झाला आहेत असे समजा’. यानंतर सामंथा म्हणाली, “मी स्वतःला आता आधी पेक्षा जास्त मजबूत फिल करते. असे यासाठी वाटते कारण, मी इथपर्येंत पोहचण्यासाठी आगीचा सामना केला आहे.” असे समंथाने म्हणून आपले मन व्यक्त केले.
कामाच्या आघाडीवर, समंथा शेवटची पडद्यावर विजय देवरकोंडासोबत ‘कुशी’ चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला. अनेकांनी नागा चैतन्यपासून तिचा घटस्फोट हे यामागचे कारण सांगितले आहे. परंतु ती लवकरच नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.