प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस म्हणजे आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करणे. लग्न ठरल्यानंतर दोन ते तीन महिने साखरपुडा केला जातो. हिंदू विवाहात केलेल्या जाणाऱ्या प्रत्येक सोहळ्याला विशेष महत्व आहे. साखरपुड्याच्या दिवशी नवरा नवरीच्या हातामध्ये अंगठी घालतो. यादिवशी नववधू प्रामुख्याने हिरव्या रंगाची साडी परिधान करते. साखरपुड्यात हिरव्या रंगाची साडी परिधान करण्यामागे समृद्धी, नवीन सुरुवात आणि सुभतेचे प्रतीक मानले जाते. हिरवा रंग नववधूच्या आयुष्यात महाराष्ट्रीयन संस्कृतीत हिरवा रंग नवनिर्मिती, सुखी वैवाहिक जीवन, सुपीकता आणि नैसर्गिकतेचा (निसर्गाचा) आशीर्वाद मानला जातो. हा रंग नववधूच्या आयुष्यात भरभराट आणि शांतता घेऊन येतो, अशी मान्यता आहे. चला तर जाणून घेऊयात साखरपुड्यात नववधू हिरव्या रंगांची साडी का परिधान करते. (फोटो सौजन्य – pinterest)
साखरपुड्यातील हिरव्या रंगाच्या साडीचे महत्व! नव्या आयुष्याची हिरवी सुरुवात दर्शवणाऱ्या परंपरेमागील जाणून घ्या खास कारणे

हिरवा रंग हा निसर्गातील अंकुरणाचे प्रतीक मानला जातो. हिरव्या रंगाच्या साडीमध्ये नववधू अतिशय खुलून आणि उठावदार दिसते. लग्नात नेसल्या जाणाऱ्या प्रत्येक साडीला खूप जास्त महत्व असते.

हिरवा रंग हा भरभराट, सौभाग्य आणि सुखासमाधानाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे साखरपुड्याच्या शुभ प्रसंगी नववधू हिरव्या रागातील विविध शेड्स असेलली साडी परिधान करते.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये नववधूला साखरपुड्यात हिरव्या रंगाची साडी देण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळातील प्रथा, परंपरा अजूनही फॉलो केल्या जात आहेत.

हिरवा रंग मनाला शांतता देतो. त्यामुळे साखरपुड्यात तुम्ही हिरव्या रंगाची पैठणी, बनारसी, कांजीवरम किंवा सिल्क साडी सुद्धा परिधान करू शकता.

हिरव्या रंगाच्या साडीवरील लुक आणखीनच उठावदार आणि स्टायलिश करण्यासाठी तुम्ही त्यावर मोत्याचे किंवा सोन्याचे सुंदर सुंदर दागिने परिधान करू शकता.






