(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
दो पत्तीमध्ये क्रिती सेनॉनने दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती जुळ्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. तसेच या चित्रपटामध्ये काजोल आणि शाहीर शेख देखील काम करताना दिसणार आहेत. काजोल एक पोलीस अधिकारीच्या भूमिकेत या चित्रपट नवीन रंगत आणणार आहे. दो पत्तीच्या बॅकस्टोरीमध्ये क्रिती सेनॉन उर्फ सौम्याची कहाणी दाखवली आहे, जी ध्रुवच्या प्रेमात असते. ध्रुव आणि सौम्याची प्रेमकहाणी सुरू होते आणि सौम्याच्या जुळ्या बहिणीचा प्रवेश होताना या सिरीजमध्ये दिसणार आहे. दो पत्ती हा चित्रपट दोन जुळ्या बहिणींच्या गडद रहस्यावर आधारित आहे, जी त्यांच्या आयुष्यात एक वाईट वळण घेते.
‘दो पत्ती’ वेब सिरीजमधील ‘रांझन’ या पहिल्या गाण्याला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर आता ‘दो पत्ती’ मधील ‘जादू’ हे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे एक हृदयस्पर्शी रोमँटिक गाणे आहे जे शाहीर शेख आणि क्रिती सेनॉन यांच्यातील रोमँटिक क्षणांचे चित्रण करते. हे गाणे शाहीर आणि क्रितीच्या पात्रांमधील प्रणय अधिक एक्सप्लोर करते आणि चित्रपटाच्या मंत्रमुग्ध कथेला जोडते. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘रांझन’ या ट्रेलरला प्रेक्षक आणि चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. शाहीर आणि क्रितीच्या अप्रतिम केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकली होती. या गाण्याचे भावनिक बोल आणि सुखदायक सूर प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले आणि ते झटपट हिट झाले.
“जादू” हे गाणं एक मनापासून आणि जादूचा अनुभव देते. म्युझिक व्हिडिओमध्ये प्रेम आणि रोमान्सच्या भावनेचे सुंदर चित्रण केले आहे, शाहीर शेख मध्यभागी आहे. “जाडू” चे व्हिज्युअल प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहेत, जे शाहीर आणि क्रिती या दोन्ही पात्रांनी शेअर केलेले कोमल आणि उत्कट क्षण दर्शवतात.
हे देखील वाचा – सहजीवनाची चटकदार गोष्ट उलगडणारा ‘पाणीपुरी’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!
‘दो पत्ती’ चित्रपटामध्ये पहिल्यांदाच क्रिती निर्माती म्हणून पदार्पण करत आहे, तर शाहीर शेखचा हा बॉलिवूडमधील हा पहिला चित्रपट आहे. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रसिद्ध नाव, शाहीर मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. त्याचा या चित्रटामधील अभिनय आणि कथा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. क्रिती सेनॉन ‘दो पत्ती’ मध्ये दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोल आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त शाहीर शेख आणि शशांक चतुर्वेदी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे हा चित्रपट फक्त प्रेक्षक नेटफ्लिक्सवरच पाहू शकता.