(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुंबईत एक आलिशान घर खरेदी केले आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने हे घर तिचे वडील आणि अभिनेता शक्ती कपूर यांच्यासोबत खरेदी केले आहे. या घराची किंमत कोटींमध्ये आहे. या घराच्या नोंदणीचे काम १३ जानेवारी रोजीच पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्रद्धा कपूरचे हे घर मुंबईतील परिसरात खरेदी केले आहे. अनेक कलाकारांची घरे या अपार्टमेंटमध्ये आहेत. हा परिसर खूप प्रसिद्ध आहे. आता अभिनेत्रीच्या या नवे घर खरेदी केल्याच्या बातमीने चाहते देखील आनंदी झाले आहेत.
श्रद्धा लवकरच होणार शिफ्ट
सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या पालकांसोबत राहते, परंतु ही मालमत्ता खरेदी केल्यानंतर श्रद्धा तिथे स्थलांतरित होऊ शकते अशी चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या या मालमत्तेची किंमत सुमारे ६.२४ कोटी रुपये आहे. हे आलिशान घर घेण्याचे बातमीने श्रद्धाच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
श्रद्धाचे हे आलिशान अपार्टमेंट कुठे आहे?
श्रद्धाने खरेदी केलेले हे आलिशान अपार्टमेंट पिरामल महालक्ष्मी साउथ टॉवरमध्ये आहे, जे रेस कोर्स आणि समुद्राच्या दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. १०४२.७३ चौरस फूट जागेत पसरलेल्या या अपार्टमेंटमध्ये दोन बाल्कनी आहेत. २०२४ मध्ये श्रद्धा कपूरने जुहूच्या हाय-एंड रेसिडेन्शियल टॉवरमध्ये एक आलिशान अपार्टमेंट ६ लाख रुपये प्रति महिना भाड्याने घेतले होते. पण आता श्रद्धा लवकरच तिच्या स्वतःच्या मालमत्तेत स्थलांतरित होणार आहे.
Saif Ali Khan: हल्ल्यानंतर सैफ पहिल्यांदाच आला समोर; मीडियाची घेतली भेट; व्यक्त केले आभार!
श्रद्धा कपूरची कारकीर्द
२०२४ हे वर्ष श्रद्धासाठी एक ऐतिहासिक वर्ष ठरले आहे. तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशासह अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. सुरुवातीला या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला मागे टाकले. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरभरून कमी केली. आणि अखेर पुढे अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’च्या हिंदी डब केलेल्या आवृत्तीनेही आघाडी घेतली. तिच्या कारकिर्दीत वाढ होत असताना आता अभिनेत्रीच्या या घराच्या बातमीने चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे. श्रद्धा कपूरचा बॉलिवूड आणि रिअल इस्टेटमधील प्रवास चमकताना दिसत आहे.